उल्हासनगरात पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट, एकाला अटक २० जणांना नोटीसा, तर १६२ वाहनाची तपासणी
By सदानंद नाईक | Updated: October 5, 2025 22:41 IST2025-10-05T22:41:13+5:302025-10-05T22:41:13+5:30
या अभियानात ३६ तर १६६ पोलीस कर्मचारी सहभागी झाले.

उल्हासनगरात पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट, एकाला अटक २० जणांना नोटीसा, तर १६२ वाहनाची तपासणी
सदानंद नाईक
उल्हासनगर : पोलीस परिमंडळ-४ मधील गुन्हेगारावर वचक राहण्यासाठी पोलिसांनी शनिवारी रात्री ११ ते रात्री १ वाजेपर्यंत दरम्यान “ऑपरेशन ऑल आउट” राबविले. यामध्ये एकाला अटक करून २० जणांना विविध गुन्ह्या अंतर्गत नोटीसा देऊन नाकाबंदी मध्ये १६२ वाहनाची तपासणी करून ५० हजाराची दंडात्मक कारवाई केली. उल्हासनगर पोलीस परिमंडळ-४ अंतर्गत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉम्बिंग ऑपरेशन सहाय्यक पोलिस आयुक्तांनी राबविले. गुन्हेगारीच्या अड्ड्यावर धाडी टाकून कारवाई करण्यात आली. या अभियानात ३६ तर १६६ पोलीस कर्मचारी सहभागी झाले.
मद्यनिषेध संबंधित प्रकरणी ४ जणांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. तसेच अंमली पदार्थ सेवन प्रकरणी ३ जणांना नोटीसा, एमपी कायाद्या अंतर्गत दोघांना नोटीस देऊन एकाला अटक केली. ९३ लॉज व बार तपासणी करून, हिस्ट्रीशीटर, दादागिरी करणारे व बाहेरगावी हद्दपार व्यक्ती तपासणी केली. वाँटेड आरोपी व शस्त्रप्रकरणी तपासणी केली. एकूण २० जणांना नोटिसा देऊन एकाला अटक केली. पोलिसांनी एकूण ८ ठिकाणी नाकाबंदी करून १६२ वाहनांची तपासणी केली. यावेळी एकूण ५१ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या ऑपरेशन ऑल आऊट कार्यक्रमामुळे गुंडाचे धाबे दणाणले असून अशी कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे.