चोरट्याच्या झटापटीत प्रवासी जखमी, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 23:13 IST2021-06-11T23:12:56+5:302021-06-11T23:13:19+5:30

एक प्रवासी रेल्वेच्या दारात उभा होता. रेल्वे गाडी कल्याण रेल्वे स्थानकात आली असता गाडी थांबली असताना चोरट्याने प्रवाशाच्या खिशातून  मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.

Passenger injured in burglary, incident at Kalyan railway station | चोरट्याच्या झटापटीत प्रवासी जखमी, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

चोरट्याच्या झटापटीत प्रवासी जखमी, कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

कल्याण - कळवा रेल्वे स्थानकात चोरट्याशी झालेल्या झटापटीत डोंबिवलीतील विद्या पाटील या प्रवासी महिलेचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कल्याणरेल्वे स्थानकात चोरट्याशी झालेल्या झटापटीत प्रवासी जखमी झाला आहे. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी प्रवाशांने अन्य प्रवाशांच्या मदतीने जखमी प्रवाशाला टिटवाळा रेल्वे स्थानकात उपचारासाठी नेले असता त्याठिकाणी प्रथमोपचाराची सुविधा नसल्याने प्रवासी संतप्त झाले. या घटनेचा व्हीडीओ प्रवाशांनी सोशल मिडियावर टाकला आहे.

एक प्रवासी रेल्वेच्या दारात उभा होता. रेल्वे गाडी कल्याण रेल्वे स्थानकात आली असता गाडी थांबली असताना चोरट्याने प्रवाशाच्या खिशातून  मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रवाशाने खिसा घट्ट धरुन ठेवला. गाडी चालू होताच पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रवाशाने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता चोरट्याने प्रवाशांच्या नाकावर जोरदार प्रहार केला. चोरट्याने हल्ला करुन पळ काढला. या हल्ल्यात प्रवासी रक्तबंबाळ झाला. जखमी प्रवाशाला इतर प्रवाशांनी टिटवाळा रेल्वे स्थानकात प्रथमोपचारासाठी नेले असता त्याठिकाणी प्रथमोपचाराची काही व्यवस्था नसल्याने प्रवासी संतप्त झाले. या घटनेचा व्हीडीओही प्रवाशांनी तयार करुन तो सोशल मिडियावर टाकला आहे. रेल्वे स्थानकात साधी प्रथमोपचाराची सुविधा नाही. 
प्रवाशावर झालेला हल्ला आणि प्रथमोपचाराची सुविधा नसणो यावरुन रेल्वेला प्रवाशांच्या जिविताचे काही एक गांभीर्य नाही. तसेच प्रवाशांची जिवित सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा उघड झाले आहे. या घटनेला कल्याण रेल्वे पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या घटनेचा तपास सुरु आहे.

Web Title: Passenger injured in burglary, incident at Kalyan railway station