"अडथळ्यांची शर्यत तयार करून विकास कामाची गती मोजायची," मुख्यमंत्र्यांनी केले भाजपला लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 06:25 PM2021-01-25T18:25:56+5:302021-01-25T18:58:04+5:30

Uddhav Thackeray : एकीकडे तगडय़ात तंगडे अडकवून अडथळ्य़ाची शर्यत निर्माण करायची आणि दुसरीकडे विकास कामांची गती मोजायची असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

Online inauguration of Patri Pool at the hands of Chief Minister Uddhav Thackeray | "अडथळ्यांची शर्यत तयार करून विकास कामाची गती मोजायची," मुख्यमंत्र्यांनी केले भाजपला लक्ष्य

"अडथळ्यांची शर्यत तयार करून विकास कामाची गती मोजायची," मुख्यमंत्र्यांनी केले भाजपला लक्ष्य

Next

कल्याण - एकीकडे तगडय़ात तंगडे अडकवून अडथळ्य़ाची शर्यत निर्माण करायची आणि दुसरीकडे विकास कामांची गती मोजायची असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. केंद्राकडे राज्याचे अनेक प्रकल्प रखडलेले आहे. त्यात अडथळे निर्माण करुन राज्यातील विकास कामे होत नसल्याची टिका भाजप करीत असल्याने मुख्यमंत्र्यांनी हा टोला भाजलपा लगावला आहे. कल्याणमधील बहुचर्चित नव्या पत्री पूलाचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हीडीओ कॉन्फरन्स जनतेसी संवाद साधला.

या प्रसंगी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, भाजप खासदार कपील पाटील,शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड, मनसे आमदार राजू पाटील, राज्य रस्ते विकास महामंडळाचे संचालक राधेश्याम मोपलवार, माजी महापौर विनिता राणो, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. मागच्या सरकारच्या काळात कामे होत होती असे बोलून आताचे सरकार काय करीत आहे असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात असला तरी मागचे सरकार हे बोलाचाच भात आणि बोलाची कढी होते. पत्री पूलाचे काम पूर्णत्वास आल्याने महाविकास आघाडी सरकारने करुन दाखविले आहे.

विकास कामावरुन शिवसेना भाजपमध्ये टक्के टोमणे आणि टीकाबाजी
कल्याण-पत्री पूलाच्या कार्यक्रमात खासदार कपील पाटील यांनी पत्री पूलाचे काम पूर्णत्वास आले असले तरी भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्याचबरोबर ठाणो-भिवंडी-कल्याण या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ठाणो ते भिवंडी दरम्यान प्रगती पथावर आहे. मात्र भिवंडी ते कल्याण दरम्यान मेट्रो रेल्वेच्या कामाची निविदाच निघाली नाही. हे मुद्दे उपस्थित केले. पालकमंत्री या नात्याने या लक्ष्य घालणाची मागणी पाटील यांनी पालकमंत्र्यांकडे केली. त्याचबरोबर स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्राचा ५० टक्के निधी व राज्य आणि महापालिकेचा निधी मिळून हे प्रकल्प सुरु आहेत. त्यामुळे या प्रकल्पात केंद्र सरकारचे अर्थात भाजपचे योगदान असल्याचा मुद्दा उपस्थित केला. निवडणूका आल्यावर वाटप सुरु करु नका असा टोला शिवसेनला लगावला. मात्र या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पाटील यांच्या वक्तव्याला उत्तर देताना यापूर्वी ६ हजार ५०० कोटीचा निधी देण्याचे सांगण्यात आले. निवडणूकीत वचन देणारे वचन देऊन निघून गेले. त्यामुळे निवडणूकीपूरते गाजर वाटप न करता चांगली कामे करा असा सल्ला भाजपला दिला. तसेच पाटील यांच्या टिकेचा खरपूस समाचार घेत आम्ही चांगली कामे केली आहेत. ती जनतेसमोर आहेत असे वक्तव्य केले.

Web Title: Online inauguration of Patri Pool at the hands of Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.