शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीतील विदारक चित्र, रुग्णालयात बाकावरच दिला जातोय ऑक्सीजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 21:39 IST

बेड फूल असल्याने ही स्थिती, हतबल प्रशासनाकडून रुग्णाचा जीव वाचविण्याचा प्रयत्न

कल्याण - कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. तरी देखील वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत बेडची संख्या कमी पडत आहे. त्याचा एक विदारक प्रत्यय आज महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आला. रुग्णांना रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये असलेल्या बाकांवरच झोपवून ऑक्सीन दिला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

महापालिका हद्दीत एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. महापालिकेने आरोग्य यंत्रणा उभारली आहे. रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणा अपुरी पडत आहे. महापालिकेची सहा कोविड रुग्णालये आणि कोविड केअर सेंटर आहे. त्याशिवाय 68 खाजगी कोविड रुग्णालये सुरु आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता महापालिका आणि खाजगी कोविड रुग्णलायात एकही बेड उपलब्ध होत नाही. त्यात महापालिकेने टेस्टींगचे प्रमाण वाढविल्याने रुग्ण पॉझीव्हीटी रेट जास्त आहे. महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात दोन दिवसापूर्वीच संशयीत रुग्णांकरीता माणूसकीचा वार्ड सुरु करण्यात आला. हा वार्डही फूल झाला आहे. आज संशयीत रुग्ण आहे. ज्यांना ऑक्सीजनची गरज आहे. ज्यांची स्थिती गंबीर आहे. त्यांना रुग्णालयाच्या पॅसेजमधील बाकावरच ऑक्सिजन लावल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले. रुग्णांना बेड मिळत नसल्याने रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी धावपळ करणारे रुग्णाचे नातेवाईक हवालदिल झाले आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे विचारणा केली असता महापालिका बेडची क्षमता वाढविण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशील आहे. रुक्मीणीबाई रुग्णालयात रुग्णांना ऑक्सीजन बाकावर झोपवून दिला जात आहे, ही वस्तूस्थिती आहे. मात्र, रुग्णांचा जीव वाचविणे हा महत्वाचा उद्देश त्यात आहे. त्यांची गैरसोय होत आहे. मात्र त्यावर लवकरच मात केली जाईल.

आज सायंकाळी अत्यंत तातडीची बैठक आयुक्तांनी घेतली. त्यात महापालिकेचे अधिकारी, आरोग्य विषय तज्ज्ञ उपस्थित होते. उद्या देखील आयुक्त वेबीनॉर द्वारे खाजगी कोविड रुग्णालयांशी  संवाद साधणार आहे. त्यात इंजेक्शनचा वापर, बेडची उपलब्धता, ऑक्सीजनचा पुरवठा या संदर्भात आढावा घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीhospitalहॉस्पिटल