गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; जोडे मारून केला निषेध
By प्रशांत माने | Updated: September 24, 2023 16:51 IST2023-09-24T16:50:47+5:302023-09-24T16:51:03+5:30
अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे पडळकरांविरोधात आंदोलन.

गोपीचंद पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; जोडे मारून केला निषेध
कल्याण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह्य विधान केल्याच्या निषेधार्थ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आज दुपारी येथील पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली शहर जिल्हा यांच्या वतीने जोडे मारो आंदोलन छेडण्यात आले. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या विधानाचा यावेळी निषेध केला गेला. पडळकर हे समाजातील एक विकृती आहेत.
आमच्या नेत्यांबद्दल वारंवार त्यांच्याकडून चुकीच्या भाषेचा वापर केला गेला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यांच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात ठोस कारवाई करावी यापुढे जर अशा प्रकारे पुन्हा वक्तव्य केले तर आमच्या भावना तीव्र असतील असा इशारा अजित पवार गटातील आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी दिला.