पोलीस ठाण्यावर काढणार मोर्चा; मनोज कटके हल्ला प्रकरणी भाजप आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 11:33 IST2022-03-05T11:32:44+5:302022-03-05T11:33:36+5:30
विधिमंडळाचे अधिवेशन संपताच भाजपतर्फे डोंबिवलीतील पोलीस ठाण्यावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.

पोलीस ठाण्यावर काढणार मोर्चा; मनोज कटके हल्ला प्रकरणी भाजप आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : भाजप कार्यकर्ते मनोज कटके यांच्यावर झालेला हल्ला जीवघेणा असून, त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहेत. त्यामुळे विधिमंडळाचे अधिवेशन संपताच भाजपतर्फे डोंबिवलीतील पोलीस ठाण्यावर महामोर्चा काढण्यात येईल. त्याचे मी स्वतः नेतृत्व करेन, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कटके यांची विचारपूस करण्यासाठी फडणवीस शुक्रवारी येथील एम्स हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यावेळी ते म्हणाले, ‘हा हल्ला जीवघेणा हल्ला होता. त्यांच्यावर झालेल्या जखमा पाहून हल्ला किती गंभीर होता, हे कळते. अशा घटना यापुढे होता कामा नयेत. या हल्ल्यामागे सूत्रधाराला पोलिसांनी तातडीने अटक करावी. पोलिसांनी पारदर्शी पद्धतीने या गुन्ह्याचा तपास करावा, ही अपेक्षा आहे. पण ते करीत नसल्याने मला इथे यावे लागले. पोलीस काम करत नसतील तर मला मोर्चा काढावा लागेल, याचा आवाज सभागृहात उचलण्यात येईल.’