मनसे शहर उपाध्यक्षाला चार किलो गांजासह अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 06:57 IST2025-05-28T06:57:37+5:302025-05-28T06:57:37+5:30
शहरातील कोंबडपाडा परिसरात संशयित व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती

मनसे शहर उपाध्यक्षाला चार किलो गांजासह अटक
भिवंडी : मनसेच्याभिवंडी शहर उपाध्यक्षास भिवंडी गुन्हे शाखेने ३ किलो ९६० ग्रॅम गांजासह अटक केली. कुमार व्यंकटेश पुजारी (३४) असे अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
शहरातील कोंबडपाडा परिसरात संशयित व्यक्ती गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोंबडपाडा परिसरात मोकळ्या मैदानात सापळा रचून पथकाने पुजारीला ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्याच्याजवळ गांजा, मोबाइल व रोख रक्कम असा १ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला.
गुन्हे शाखेने त्याच्या विरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात अमलीपदार्थ विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. भिवंडी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान, याबाबत मनसे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्याकडे पुजारी हा पदाधिकारी असल्याबाबत चौकशी केली असता त्यांनी त्याची हकालपट्टी केल्याची माहिती दिली.