शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

एमएमआरडीए अर्थसंकल्पात मेट्रो - रस्ते प्रकल्पांना गती  मिळणार; ४ हजार ८९७.१९ कोटींची भरीव निधीची तरतूद

By मुरलीधर भवार | Updated: February 17, 2026 14:57 IST

कल्याण लोकसभा मतदार संघातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या मेट्रो आणि रस्ते प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी तब्बल ४ हजार ८९७.१९ कोटींची भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

- मुरलीधर भवार

कल्याण : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाचा ( एमएमआरडीए ) २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये एमएमआरडीए क्षेत्रातील विविध विकासप्रकल्पांना गती देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या मेट्रो आणि रस्ते प्रकल्पाच्या कामांना गती देण्यासाठी तब्बल ४ हजार ८९७.१९ कोटींची भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.

यामध्ये मेट्रो - ५, आणि मेट्रो - ५ अ विस्तारीकरण, मेट्रो १२, मेट्रो १४, कल्याण शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल , कल्याण रिंग रोड, विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग, ऐरोली काटई फ्री वे ( टप्पा - ३ ) या प्रकल्पांचा समावेश आहे. या भरीव निधीच्या तरतुदीसाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एमएमआरडीए प्राधिकरणाचे आभार व्यक्त केले आहेत.

यासोबतच रस्ते व उड्डाणपूल प्रकल्पांनाही मोठी चालना मिळणार आहे. कल्याण-शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल, कल्याण रिंग रोड, विठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग, ऐरोली काटई फ्री वे ( टप्पा - ३ ) या प्रकल्पांचा समावेश असून, या मार्गांमुळे शहरांतर्गत आणि आंतरशहरी वाहतुकीचे जाळे अधिक सक्षम होणार आहे. वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच औद्योगिक आणि लॉजिस्टिक वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्य सरकारच्या सहकार्यामुळे कल्याण मतदारसंघातील महत्वाकांक्षी वाहतूक प्रश्न मार्गी लागत असून नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि जलद वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

या प्रकल्पांना भरीव निधीची तरतूदमेट्रो - ५ ( ठाणे - भिवंडी - कल्याण ) - १ हजार ३०९.३० कोटीमेट्रो - ५ अ ( विस्तारित ) ( दुर्गाडी ते उल्हासनगर ) - १८३.३५ कोटीमेट्रो - १२ ( कल्याण ते तळोजा ) - १ हजार ५४.५४ कोटीमेट्रो - १४ ( कांजूरमार्ग - बदलापूर ) - ५०० कोटीकल्याण शिळफाटा जंक्शन ते भिवंडी उड्डाणपूल - १५० कोटीकल्याण रिंग रोड - ६०० कोटीविठ्ठलवाडी ते कल्याण अहिल्यानगर उन्नत मार्ग - २०० कोटीऐरोली काटई फ्री वे ( टप्पा - ३) - ९०० कोटी

लक्षणीय बदलमेट्रो मार्गिकांचा विस्तार याला केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. एमएमआरडीएने तरतूद केलेल्या या निधीतून मेट्रो जाळ्याचा विस्तार हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरणार आहे. मेट्रो-५ तसेच मेट्रो-५अ विस्तारीकरण, मेट्रो-१२ आणि मेट्रो-१४ या महत्त्वाकांक्षी मार्गांच्या कामांना गती दिली जाणार आहे. या मेट्रो प्रकल्पांमुळे कल्याण लोकसभा मतदारसंघ थेट महानगरातील प्रमुख व्यावसायिक व निवासी पट्ट्यांशी जोडला जाणार असून, रोजच्या प्रवासाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक प्रणालीला बळ मिळणार आहे. प्रकल्पांच्या अंमलबजावणीनंतर कल्याण लोकसभा मतदारसंघ केवळ निवासी विस्ताराचा भाग न राहता नियोजित शहरी विकासाचे केंद्र म्हणून विकसित होईल. वाढत्या महानगर विस्तारात कल्याण लोकसभा परिसराला स्वतंत्र ओळख देणारा हा अर्थसंकल्प ठरणार असून, येत्या काळात येथील वाहतूक, उद्योग, गुंतवणूक आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय बदल घडेल.

English
हिंदी सारांश
Web Title : MMRDA Budget Boosts Metro, Road Projects with ₹4,897.19 Crore Allocation

Web Summary : MMRDA allocates ₹4,897.19 crore for metro and road projects in Kalyan constituency. This includes Metro 5, 12, 14, Kalyan-Shilphata flyover, Kalyan Ring Road, and Airoli-Katai Freeway. The projects aim to improve connectivity and reduce traffic congestion, fostering urban development.
टॅग्स :mmrdaएमएमआरडीएEknath Shindeएकनाथ शिंदे