डोंबिवलीतील खोणी पलावा येथील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 15:30 IST2024-01-13T15:12:22+5:302024-01-13T15:30:57+5:30
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

डोंबिवलीतील खोणी पलावा येथील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
डोंबिवली परिसरातील एका बहुमजली निवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीजवळील खोणी पलावा येथील एका इमारतीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. आग सातव्या मजल्यावर लागली आणि काही वेळातच वरच्या मजल्यांपर्यंत पसरली.
सुदैवाची गोष्ट म्हणजे इमारतीत फक्त तिसऱ्या मजल्यापर्यंत लोक राहतात आणि आग लागल्यानंतर लगेचच येथे राहणाऱ्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सदर घटनेचा व्हिडीओही समोर आला असून त्यात इमारतीला भीषण आग लागल्याचे दिसत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
पाहा व्हिडीओ-
डोंबिवली- डोंबिवलीमधील खोणी पलावात एस्ट्रेला टॉवरला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या आहेत. pic.twitter.com/Y1LhcAKXtb
— Lokmat (@lokmat) January 13, 2024