भोंगे प्रकरण; मनसे जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यास सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 20:21 IST2022-04-29T20:20:23+5:302022-04-29T20:21:09+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापले आहे.

भोंगे प्रकरण; मनसे जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यास सुरूवात
कल्याण - मशिदींवरील भोंगे हटविण्यासंदर्भातील इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी कल्याणमधीलमनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीसा बजावण्यास सुरूवात केली आहे. मनसेने दिलेल्या ३ मेच्या अल्टीमेटवरून येथील जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह इतरही काही पदाधिकाऱ्यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा या नोटीसेद्वारे देण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला ३ मेचा अल्टीमेटम दिला आहे. त्यावरून राज्यातील राजकारण चांगलच तापले आहे. दरम्यान कायदा व्यवस्था बिघडू नये, म्हणून यासाठी पोलीस यंत्रणेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कल्याणमधील मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात बोलताना, अशा कितीही नोटीसा आल्या तरी मनसे शांत बसणार नाही. अशा नोटिसांना आम्ही घाबरत नाही. पोलिसांची नोटीस येणे, हे आम्हाला मेडल प्रमाणे आहे. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी मोठा आहे, अशी प्रतिक्रिया उल्हास भोईर यांनी लोकमतला दिली.