केडीएमटीच्या बसला भीषण आग, सुदैवाने जीवीतहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 23:02 IST2022-03-22T23:00:30+5:302022-03-22T23:02:27+5:30
बसमधून धूर येताच आतील प्रवाशांनी बाहेर पडून सुरक्षितस्थळी धाव घेतली.

केडीएमटीच्या बसला भीषण आग, सुदैवाने जीवीतहानी नाही
कल्याण - केडीएमटीच्या बसला भीषण आग लागल्याची घटना मलंग रोडवरील नेवाळी पाडा गावाजवळ आज रात्री ८ च्या सुमारास घडली. बस कल्याणहून मलंगगड येथे जात असताना हा प्रकार घडला. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
केडीएमटीच्या बसला भीषण आग, सुदैवाने जीवीतहानी नाही#KDMTbus#firepic.twitter.com/SFy6GwZGSa
— Lokmat (@lokmat) March 22, 2022
बसमधून धूर येताच आतील प्रवाशांनी बाहेर पडून सुरक्षितस्थळी धाव घेतली. दरम्यान आग इतकी भीषण होती की, संपूर्ण बस जळून खाक झाली आहे. आग लागल्याने नेवाळी मलंगगड रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. दरम्यान या घटनेची माहीती मिळताच अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली.