शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

KDMC News: कल्याणातही शिवसेना करणार भाजपावर राजकीय सर्जिकल स्ट्राईक? केडीएमसीत मोठी उलथापालथ होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 5:05 PM

Shiv Sena News: भाजपाचा बालेकिल्ला  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत तीन नगरसेवक फोडत  सेनेनं  निवडणूकीपूर्वीच धमाका केला. आता कल्याण मधील सुद्धा काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

कल्याण - केंद्रात सत्तापालट झाल्यावर कल्याण डोंबिवली मध्येही त्याचे राजकीय पडसाद उमटलेले पाहायला  मिळाले. अनेक नगरसेवकांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केलाय. पण, राज्यात अचानक महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालं आणि पुन्हा राजकीय गणितं बदलायला सुरवात झाली. मोदी लाटेन  भाजपाला तारलं . भाजपाचा बालेकिल्ला  म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत तीन नगरसेवक फोडत  सेनेनं  निवडणूकीपूर्वीच धमाका केला. आता कल्याण मधील सुद्धा काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे टप्प्याटप्याने सेना भाजपावर राजकीय सर्जिकल स्ट्राईक करणार का? असा सवाल निर्माण झाला आहे.

भाजपामध्ये असलेले माजी नगरसेवक  महेश पाटील, डॉ सुनीता पाटील, सायली विचारे यांनी हातात शिवबंधन बांधले. मात्र यावर सेना थांबली नसून जिल्हा पातळीवरून अनेक हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय. डोंबिवली नंतर आता कल्याणमध्ये भाजपाला धक्का देण्याचे प्रयत्न सेनेकडून केले जाणार आहेत.कल्याण पूर्वेतील काही  नगरसेवकही सेनेत यायला इच्छुक असल्याच कल्याण पूर्वेचे सेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितलं आहे. याची माहिती खासदार डॉ  श्रीकांत शिंदे यांना सांगितली असून लवकरच याबाबत निर्णय होईल असेही  गायकवाड यांनी सांगितलं. त्यामुळे येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात अनेक उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका