कल्याण पश्चिमेत चाळीचा स्लॅब कोसळला

By मुरलीधर भवार | Updated: June 16, 2025 18:32 IST2025-06-16T18:30:41+5:302025-06-16T18:32:41+5:30

Rain In Mumbai: या चाळीत चार कुटुंबे राहत होती. ही चाळ तातडीने रहिवासमुक्त करण्यात आली आहे.

Kalyan Rain news: A slab of Chawl collapsed in Kalyan West due to heavy rain in Mumbai area | कल्याण पश्चिमेत चाळीचा स्लॅब कोसळला

कल्याण पश्चिमेत चाळीचा स्लॅब कोसळला

कल्याण : शहराच्या पश्चिम भागातील संतोषी माता रोड परिसरातील तळ अधिक एक मजली असलेल्या राऊत चाळीचा स्लॅब कोसळला. ही घटना आज सकाळी सात वाजता  घडली. या घटनेत काेणतीही जिवित हानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. या चाळीत चार कुटुंबे राहत होती. ही चाळ तातडीने रहिवासमुक्त करण्यात आली आहे. चाळ ही ३० वर्षापेक्षा जास्त जुनी आहे. चाळीचा स्लॅब हा जुना असल्याने तो कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या चाळीचे मालक राजू बारी यांना महापालिकेच्या वतीने स्ट्र्क्चरल ऑडिट करण्याची नोटीस महापालिकेने बजावली आहे.

मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेश नगर भागात नाल्यावरील पूल कोसळला आहे. या अपघातात एक तरुणी थोडक्यात बचावली आहे. हा पूल कोसळल्याने ५०० पेक्षा अधिक घरांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. कॅम्प नंबर पाचच्या गणेश नगर भागात नाल्यावर असलेल्या या पूलाची दुरावस्था झाली होती. 

Web Title: Kalyan Rain news: A slab of Chawl collapsed in Kalyan West due to heavy rain in Mumbai area