शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे चार उमेदवार बिनविरोध विजयी; केडीएमसीत दाेघींविरोधात उमेदवारी अर्जच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 15:21 IST

... तर पनवेलमध्ये याच पक्षाचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत भाजपचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी झाले. यापैकी दोन उमेदवारांविरोधात कुणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांना ही लॉटरी लागली. तर पनवेलमध्ये याच पक्षाचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला आहे.  कल्याण-डोंबिवलीत रेखा राजन चौधरी (पॅनल क्रमांक १८-अ), आसावरी केदार नवरे (पॅनल क्रमांक २६-क), रंजना मितेश पेणकर (पॅनल २६-ब) हे भाजप उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामधील पेणकर या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नगरसेवक असतानाच्या सावरकर रोड या प्रभागातून बिनविरोध विजयी झाल्या आहेत.  नवरे, चौधरी यांच्यासमोर एकही उमेदवार अर्ज न आल्याने त्यांचा विजय झाला. तर, पेणकर यांच्यासमोर एका अपक्ष महिलेने अर्ज केला होता, तो अर्ज छाननीमध्ये बाद ठरवण्यात आल्याने त्यांचा विजय झाला.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्हिडीओ कॉल करून विजयी उमेदवारांची ओळख करून दिली.

शेकापचा अर्ज बाद; नितीन पाटील यांना लॉटरी पनवेल प्रभाग क्रमांक १८ मधून भाजपचे नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने पाटील विजयी झाले. पाटील याआधी महापालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक होते. गावंड हे एकेकाळी भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांचे स्वीय सहायक होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Wins Unopposed in Kalyan-Dombivli, Panvel Municipal Elections

Web Summary : BJP secured four unopposed wins in Kalyan-Dombivli and Panvel civic polls. Two KDMC candidates won due to no opposing nominations; another after scrutiny rejection. A Panvel candidate won after opponent's disqualification.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६