कल्याण : परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता लसीकरणाची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 19:11 IST2021-06-01T19:11:20+5:302021-06-01T19:11:51+5:30
Coronavirus Vaccine : विद्यार्थ्यांना सादर करावी लागणार कागदपत्रे

कल्याण : परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरीता लसीकरणाची सुविधा
कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीतून परदेशात शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या १८ ते ४५ वर्षे वयोगटीतील विद्यार्थ्यांकरीता स्वतंत्र कोविशिल्ड लसीकरणाची सोय करण्यात आली आहे. २ आणि ३ जून रोजी कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रावर करण्यात ही लस देण्यात येईल. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेर्पयत लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट यापैकी एक कागदपत्रं असणं आवश्यक आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांना आय २० फॉर्म, डीएस १६० फार्म आणि परदेशी विद्यापीठाचे शिक्षण संस्थेचे पत्र यापैकी एक सादर करावे लागेल. कागदपत्रंच्या ङोरॉक्स प्रती आणि मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी लसीकरण केंद्रावर घेऊन यावी लागणार आहेत. झेरॉक्स प्रती लसीकरण केंद्रावर जमा करुन घेतल्या जातील.
या लसीकरण सुविधेचा परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. महापालिकेत लस उपलब्ध न झाल्यामुळे परदेशी शिक्षण घेण्यासाठी प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांव्यतिरिक्त अन्य सर्व नागरीकांना इतर सर्व केंद्रावर उद्या लसीकरण बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.