Kalyan: कारागृहासमोर 'भाई'चा वाढदिवस साजरा करणाऱ्यांची पोलिसांनी चांगलीच जिरवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 21:41 IST2026-03-17T21:40:25+5:302026-03-17T21:41:19+5:30

आधारवाडी कारागृहासमोर भाईच्या वाढ दिवसानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करणे भाईच्या समर्थकाना चांगलेच महागात पडले आहे. 

Kalyan: 3 Arrested for Bursting Crackers Outside Aadharwadi Jail to Celebrate Bhai Birthday; Police Paraded Accused in Public | Kalyan: कारागृहासमोर 'भाई'चा वाढदिवस साजरा करणाऱ्यांची पोलिसांनी चांगलीच जिरवली!

Kalyan: कारागृहासमोर 'भाई'चा वाढदिवस साजरा करणाऱ्यांची पोलिसांनी चांगलीच जिरवली!

कल्याण: आधारवाडी कारागृहा समोर भाईच्या वाढ दिवसानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करणे भाईच्या समर्थकाना चांगलेच महागात पडले आहे. तिघांना अटक करुन खडकपाडा पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. भाईच्या समर्थकांवर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. कारागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ फटाके फोडल्याने एकच खळबळ उडाली होती. याचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.

कल्याणमधील आधारवाडी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काही तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. कारागृह पोलिसांनी मज्जाव केला असता त्यांच्यासोबत धक्काबुक्की करणारे फटाके फोडणारे तिथून पसार झाले. इतेकच नाही तर या तरुणांनी फटाके फोडल्याचा व्हीडीओ सोशल मिडियावर व्हायरल केली होता. ही बातमी एनडीटीव्हीने केली होती. यानंतर खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. व्हायरल व्हीडीओ आणि कारागृहातील सीसीटीव्हीच्या सहाय्याने चौघांची ओळख पटली. तपासा दरम्यान पोलिसांनी रोहित जगदाळे आणि त्यांच्यासोबत असलेल्या क्षितिज भगत आणि आकाश खडसे या तिघांना अटक केली. त्यांना कल्याण न्यायालयात हजरकेले. तिघांना पोलिसांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

चौथ्या आरोपीचा शोध सुरु आहे. अटक आरोपीची जेल परिसरात पोलिसांनी धिंड काढली. पुन्हा असा कोणी प्रकार करुन नये यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. उल्हासनगरात एका हत्येच्या प्रकरणात सतीश कांबळे उर्फ सत्या भाई हा गेल्या सहा वर्षापासून कारागृहात आहे. त्याचा रविवारी वाढ दिवस होता. त्या वाढ दिवसानिमित्त त्याच्या समर्थकांनी कारागृहाच्या बाहेर फटाके फोडले. अटक आरोपी पैकी रोहित जगदाळे हा देखील हत्या प्रकरणात कारागृहात होता. काही दिवसापूर्वीच तो जामीनावर सुटला आहे. यातील अटक आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरु आहे.

Web Title : कल्याण: जेल के बाहर 'भाई' का जन्मदिन मनाना पड़ा महंगा, पुलिस ने सिखाया सबक।

Web Summary : कल्याण पुलिस ने आधारवाड़ी जेल के बाहर गैंगस्टर का जन्मदिन पटाखे फोड़कर मनाने के आरोप में तीन लोगों को गिरफ्तार किया। आपराधिक पृष्ठभूमि वाले समर्थकों को हिरासत में लिया गया और इलाके में परेड कराई गई ताकि भविष्य में ऐसी घटनाएं न हों। चौथे संदिग्ध की तलाश जारी है।

Web Title : Kalyan: Jail stunt backfires; Birthday fireworks land supporters in police net.

Web Summary : Kalyan police arrested three for celebrating a gangster's birthday with fireworks outside Adharwadi Jail. The supporters, with prior criminal records, were taken into custody and paraded in the area to deter future incidents. A search for the fourth suspect is underway.