शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

KDMC मध्ये उलटफेर! एकनाथ शिंदेंनी मनसेला सोबत घेताच भाजपानं उद्धवसेनेला दिला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:45 IST

मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीत स्थिर सत्तेसाठी शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता भाजपानेही उद्धवसेनेसोबत संपर्क केला आहे.

डोंबिवली - कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपा आणि शिंदेसेनेने महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढली असली तरी याठिकाणी निकालानंतर सत्तासंघर्ष दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीत महापौरपदाची सूत्रे हाती घेण्यासाठी शिंदेसेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात शिंदेंच्या खेळीने उद्धव ठाकरेंसहभाजपालाही धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेची शिंदेसेनेला साथ मिळाली आहे. याठिकाणी शिंदेसेनेचे ५३ आणि मनसेचे ५ असं मिळून एकूण संख्याबळ ५८ झाले आहे तर दुसरीकडे भाजपाकडे ५० जागा आहेत. याठिकाणी बहुमताचा आकडा ६२ असून शिंदेसेनेने सत्ता समीकरणात मनसेला सोबत घेतल्याने भाजपाला धक्का बसला आहे.

मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीत स्थिर सत्तेसाठी शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. मात्र महायुतीत भाजपा ५० आणि शिंदेसेना ५३ जागांवर विजयी झाली असताना महायुतीकडे भक्कम बहुमत होते. तरीही शिंदेसेनेने मनसेला जवळ केल्याने कल्याण डोंबिवलीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती शिंदेसेनेने खेळल्याचे समोर आले. त्यातून आता पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदेंचा डाव उलथावून लावण्यासाठी भाजपानेही उद्धव ठाकरेंना प्रस्ताव दिल्याचे पुढे आले आहे. 

कल्याण डोंबिवलीत उद्धवसेनेचे ११ नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र यापैकी ४ नगरसेवक निकालापासून नॉट रिचेबल आहेत. तर उरलेल्या ७ नगरसेवकांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत कल्याण डोंबिवली महापालिका उद्धवसेनेच्या नगरसेवकांच्या गटनेतेपदी उमेश बोरगावकर यांची निवड करण्यात आली. मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केडीएमसीतील नगरसेवकांना मार्गदर्शन केले. त्यात कुणाकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास विचार करावा असं विधान उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे केडीएमसीत उद्धव ठाकरे सत्तेत बसणार का अशी चर्चा सुरू झाली. 

मातोश्रीवरील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गटनेते उमेश बोरगावकर यांनी सूचक विधान केले. त्यात आमच्याशी संपर्क सुरू आहे. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. आम्हाला भाजपा आणि शिंदेसेनेने संपर्क केला आहे. पाठिंबा मागण्यासाठी संपर्क केला आहे. जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने आमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो सन्मानजनक असेल आणि त्याबाबत आम्ही विचार कसा करावा आणि काय करावा, त्याबद्दल आमची चर्चा झाली. डोंबिवलीतील भाजपा नेते दीपेश म्हात्रे यांच्याशी फोनवरून बोलणं झाले आहे. त्यांना आम्हाला प्रस्ताव दिला आहे. त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे अशी प्रतिक्रिया बोरगावकर यांनी दिली. त्यामुळे मनसेनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : KDMC Politics: Shinde Allies with MNS, BJP Offers Proposal to Uddhav

Web Summary : KDMC witnesses political shifts as Shinde's Sena aligns with MNS, sidelining BJP. BJP then approached Uddhav Thackeray for support. Discussions are ongoing about potential alliances and power dynamics within the KDMC, with all parties exploring options for forming a stable government.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेEknath Shindeएकनाथ शिंदे