चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये भांडण मध्यस्थी करणाऱ्याकडून दांडक्याने प्रहार; पतीचा मृत्यू

By प्रशांत माने | Updated: May 6, 2024 17:09 IST2024-05-06T17:09:18+5:302024-05-06T17:09:51+5:30

मानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

in dombivali a caning by an arbitrator in a quarrel between husband and wife on suspicion of character death of husband | चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये भांडण मध्यस्थी करणाऱ्याकडून दांडक्याने प्रहार; पतीचा मृत्यू

चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये भांडण मध्यस्थी करणाऱ्याकडून दांडक्याने प्रहार; पतीचा मृत्यू

प्रशांत माने, डोंबिवली: चारित्र्याच्या संशयावरून पती-पत्नीमध्ये झालेल्या भांडणात मध्यस्थी करायला आलेल्याने डोक्यात दांडक्याने प्रहार केल्याने पतीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उसरघर परिसरात घडली. मानपाडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सुफीया अन्सारी आणि तीचा पती जोहरअली हे दोघेही बांधकाम साईटवर मजुरीचे काम करतात. जोहरअली हा सातत्याने सुफीयावर चारित्र्याचा संशय घेऊन तीला मारहाण करायचा. शेजारी राहणा-या तहियादअली याच्याशी पत्नी सुफीयाचे अनैतिक संबंध असल्याचा तो आरोप करायचा. तहियादअली हा देखील जोहरअली याचे त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध आहे असल्याचा संशय घ्यायचा. या कारणांवरून तहियादअली आणि जोहरअली या दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचे. दरम्यान शनिवारी रात्री ८ वाजता जोहरअली दारू पिऊन घरी आला त्याने सुफीयाशी वाद घालायला सुरूवात केली. भांडणाचा आवाज ऐकून शेजारी राहणारा तहियादअली दोघांचे भांडण सोडविण्यासाठी आला. यावेळी त्याने रागाच्या भरात लाकडी दांडक्याने जोहरअलीच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यात गंभीर जखमी झालेल्या जोहरअलीचा मृत्यू झाला. ताहियाद विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक केली आहे.

Web Title: in dombivali a caning by an arbitrator in a quarrel between husband and wife on suspicion of character death of husband