भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

By अनिकेत घमंडी | Updated: December 6, 2022 18:21 IST2022-12-06T18:20:56+5:302022-12-06T18:21:48+5:30

६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यांच्या विचार व आठवणींना उजाळा

Greetings to Babasaheb on behalf of BJP Kalyan district | भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

भाजपा कल्याण जिल्ह्याच्या वतीने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

डोंबिवली : भाजप कल्याण जिल्ह्याच्या वतीने भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.  ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नेहमीच आदर्श मानलेल आहे. दीनदलित बहुजन सर्वसामान्य नागरिकांसह सर्व समाज धर्मासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले काम हे अमूल्य आहे. माणसाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी संविधानाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकालाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांचे काम अतुलनीय असल्याचे मनोगत  जिल्ह्याचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली.  याप्रसंगी  जिल्हा उपाध्यक्ष अनिरुद्ध जाधव, मिहीर देसाई, लक्ष्मण पाटील, मितेश पेणकर, ज्योती भोईर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Babasaheb on behalf of BJP Kalyan district