कल्याणमधील तरुणाच्या हत्ये प्रकरणी चौघांना अटक; पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून केली हत्या

By मुरलीधर भवार | Updated: July 3, 2024 14:56 IST2024-07-03T14:55:43+5:302024-07-03T14:56:12+5:30

हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिली आहे.

Four arrested in Kalyan youth murder case Killed due to an earlier quarrel | कल्याणमधील तरुणाच्या हत्ये प्रकरणी चौघांना अटक; पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून केली हत्या

कल्याणमधील तरुणाच्या हत्ये प्रकरणी चौघांना अटक; पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून केली हत्या

कल्याण-शहराच्या पूर्व भागातील शंभरफूटी रस्त्याच्या चौकात १ जुलै रोजी संदीप राठोड यांची पाच जणांनी धारदार हत्याराने हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस आणि कल्याण गुन्हे अन्वेषम शाखेच्या पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. ही हत्या पूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक कदम यांनी दिली आहे.

संदीप राठोड हा द्वारलीपाडा येथे राहत होता. तो १ जुलै रोजी सायंकाळी त्याचा मित्र प्रेम चव्हाण याच्यासोबत दुचाकीवरुन घरी जाण्यास निघाला होता. वाटेत शंभरफूटी चौकानजीक एका दारुच्या दुकानातून बिअर घेण्यासाठी संदीप आणि चव्हाण थांबले होते. बिअर घेऊन निघाले असता त्याच चौकात पाच जणांनी संजय याच्यावर चा’परने हल्ला केला. हल्ला करुन ते पसार झाले. संदीपचा मृत्यू झाला. या प्रकरणी कल्याणच्या काेळसेवाडी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोळसेवाडी पोलिसांनी पेंद्या उर्फ अरविंद गाळपांडे यांच्यासह एका अल्पवयीन तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शैफ उर्फ साहिल शेख आणि विद्यासागर मूर्तील उर्फ अण्णा या दोघांना अटक केली आहे. अटक आरोपीपैंकी पेंद्या याचे संदीप सोबत काही महिन्यापूर्वी भांडण झाले होते. या प्रकरणी पेंद्या याने संदीपच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या भांडणाचा राग पेंद्याच्या मनात होता. संदीपचा वचपा काढण्यासाठी पेंद्याने अन्य तीन साथीदारांना घेऊन संजयला शंभरफूटी चौकात गाठले. त्याच्यावर चा’परने हल्ला करुन त्याला जीवे ठार मारले. अटक आरोपींच्या विरोधात यापूर्वी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या हत्या प्रकरणातील अन्य एका आराेपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिस त्याचा शाेध घेत आहेत.

Web Title: Four arrested in Kalyan youth murder case Killed due to an earlier quarrel