डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीत गोडाऊनला आग, अग्निशमन दलाचे बंब घटनस्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 15:51 IST2021-07-15T15:50:26+5:302021-07-15T15:51:14+5:30
हे गोडाऊन नेमके कश्याचे आहे? यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीत गोडाऊनला आग, अग्निशमन दलाचे बंब घटनस्थळी दाखल
डोंबिवली- डोंबिवली स्टेशन जवळील जुन्या लक्ष्मी निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर एका गोडाऊनला भयानक आग लागली आहे. आगीमुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहे. अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. (Fire in the godown at the old Lakshmi Niwas building near Dombivali station, fire brigade arrives at the scene)
हे गोडाऊन नेमके कशाचे आहे? यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. तसेच ही इमारत धोकादायक असल्याची माहितीही मिळत आहे. आता या घटनेनंतर संबंधित गोडाऊनवर महापालिका कारवाई करणार का हे पहावे लागेल.
डोंबिवली - स्टेशन परिसरात पाटकर रस्त्यावरील एका दुकानाला आग, अग्निशमन दलाचे बंब घटनस्थळी दाखल#Dombivli#Fire#firebrigadehttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/AS359LRJh7
— Lokmat (@MiLOKMAT) July 15, 2021