विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची सावरकर स्मारकाला शैक्षणिक भेट, लेसर शो, कोलू ओढणे, चित्रशिल्प बघून विद्यार्थी भारावले

By अनिकेत घमंडी | Published: December 21, 2022 02:59 PM2022-12-21T14:59:06+5:302022-12-21T14:59:38+5:30

Dombivali : विद्यार्थीदशेपासून लहान मुलांना स्वातंत्र्यवीर सावरकर जास्तीत जास्त कळावेत, त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा कळाव्यात म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,दादर येथे शाळकरी मुलांची शैक्षणिक भेट या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारपासून विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांपासून झाली.

Educational visit of students of Vidyaniketan School to Savarkar Memorial, laser show, kolu pulling, painting, students were overwhelmed. | विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची सावरकर स्मारकाला शैक्षणिक भेट, लेसर शो, कोलू ओढणे, चित्रशिल्प बघून विद्यार्थी भारावले

विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांची सावरकर स्मारकाला शैक्षणिक भेट, लेसर शो, कोलू ओढणे, चित्रशिल्प बघून विद्यार्थी भारावले

googlenewsNext

- अनिकेत घमंडी

डोंबिवली - विद्यार्थीदशेपासून लहान मुलांना स्वातंत्र्यवीर सावरकर जास्तीत जास्त कळावेत, त्यांनी भोगलेल्या हालअपेष्टा कळाव्यात म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,दादर येथे शाळकरी मुलांची शैक्षणिक भेट या उपक्रमाचा शुभारंभ शनिवारपासून विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांपासून झाली.

शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी पुढाकार घेऊन याउपक्रमाचे कौतुक करून शाळेच्या बहुतांशी सर्व मोठ्या विद्यार्थ्यांना ते स्मारक बघायला पाठवणार असल्याचे  सांगितले. याबाबत आयोजकांनी डोंबिवली ते दादर प्रवासात संस्थेचे डोंबिवली शहराध्यक्ष मंगेश राजवाडे यांनी भेटीची माहिती, महत्व, कार्यकारिणीची ओळख आणि संस्थेच्या उद्दिष्टाबाबत मुलांना माहिती दिली. बुधवारी  माध्यमांना त्यांनी याबाबत माहिती दिली, ते पुढे म्हणाले की, संस्थेच्या ऋजुता सावंत यांनी सावरकरांच्या आयुष्यावर आणि त्यातील काही घटनांवर माहिती देऊन एक प्रश्नमंजुषा घेतली आणि त्यात विजयी मुलांना सावरकरांची पुस्तके भेट दिली. नंतर सावरकरांच्या आयुष्यावर आधारित काही समूह खेळ किमया कोल्हे आणि डॉ. वृषाली राजवाडे यांनी घेतले.

स्मारकात पोचल्यावर तिथे असलेले क्रांतिकारक चित्र शिल्पे, शूटिंग रेंज याची माहिती स्मारकातील अधिकार्‍यांनी दिली. तसेच मुलानी बेड्या घालून कोलु फिरवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भोगलेल्या यातना कशा असतील हे समजून घेतले. नंतर सावरकरांच्या जीवनावर आधारित प्रतिकात्मक लाईट, साउंड शो मुलांनी पहिला ज्याने ते भारावून गेल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्या उपक्रमाचे नियोजन संस्थेचे शहरउपाध्यक्ष अभिजित कापाशीकर,कार्याध्यक्ष दीपक देसाई व सरचिटणीस निशांत धावसे यांनी केले. 

Web Title: Educational visit of students of Vidyaniketan School to Savarkar Memorial, laser show, kolu pulling, painting, students were overwhelmed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.