रेल्वेत फेरीवाल्यांना परवानगी नको; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

By अनिकेत घमंडी | Published: November 28, 2023 03:47 PM2023-11-28T15:47:32+5:302023-11-28T15:50:21+5:30

मध्य रेल्वे व्यवस्थापकांकडे पत्राद्वारे मागणी

Do not allow hawkers in railways; Demand of MNS MLA Raju Patil | रेल्वेत फेरीवाल्यांना परवानगी नको; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

रेल्वेत फेरीवाल्यांना परवानगी नको; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

अनिकेत घमंडी, डोंबिवली: मुंबई शहर आणि उपनगरीय रेल्वेत प्रशासनाकडून परवानगी देण्याचा विचार करण्यात येत आहे.मात्र प्रत्यक्षात रेल्वेने प्रवास करत असताना प्रवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यातच फेरीवाल्यांना परवानगी दिल्यास प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.त्यामुळे लोकल मध्ये फेरीवाल्यांना परवानगी देऊ नये यासाठी मनसे आमदार राजू पाटील हरकत घेतली आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या हि दिवसेंदिवस वाढत आहे. रेल्वेत प्रवासादरम्यान प्रवेश करण्यापासून उतरण्यापर्यत मोठा संघर्ष करावा लागत आहे.त्यातच अनधिकृत फेरीवाल्यांना प्रवेश दिल्यास प्रवाश्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सद्य परिस्थितीत अनधिकृत फेरीवाल्यांच्या तक्रारी रेल्वेकडे प्रवाश्यांनी केलेल्या लक्षणीय आहेत. मात्र प्रवाश्यांच्या तक्रारींकडे रेल्वेने दुर्लक्ष केलेलं दिसून आलं आहे.त्यामुळे रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्रवाश्यांना तारेवरची कसरत करावी लागत असताना आता फेरीवाल्यांचा मोठा मनस्ताप निर्माण होणार आहे.त्यामुळे रेल्वेने अनधिकृत फेरीवाल्यांना लोकलमध्ये माल विकण्यास दिलेल्या परवानगीचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे केली आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची वाढती संख्या लक्षात घेता लोकल वाढवण्याचे आश्वासन दिले होते.मात्र या आश्वासनाची पूर्तता होण्याआधीच रेल्वेत अनधिकृत फेरीवाल्यांना प्रवेश देऊन रेल्वे प्रवाश्यांना मनस्ताप देण्याच्या विचारात आहे.त्यामुळे रेल्वेने घेतलेल्या निर्णयाला तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Do not allow hawkers in railways; Demand of MNS MLA Raju Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.