कोविड बाधित महिला रुग्णाची प्रसुती, बाळ अन् माता दोघेही सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 23:06 IST2021-04-19T23:06:05+5:302021-04-19T23:06:48+5:30
आर्ट गॅलरी लाल चौकी येथे ॲडमिट असलेल्या महिलेने दिला बाळाला जन्म

कोविड बाधित महिला रुग्णाची प्रसुती, बाळ अन् माता दोघेही सुखरुप
कल्याण - केडीएमसी महापालिकेच्या आर्ट गॅलरी, कल्याण प. येथील कोविड रुग्णालयात 37 वर्षाची महिला 7 महिन्यांची गरोदर होती. या महिला रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर महिला रुग्णाची प्रकृती क्रिटीकल असल्यामुळे तसेच तिचे सॅच्युरेशन कमी असल्यामुळे तीला आय.सी.यू. वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, आज तिने बाळाला जन्म दिला.
सदर महिलेची आज नैसर्गिक प्रसुती होवून तीने एका नवजात बालकास जन्म दिला. सदर समयी महिलेची तपासणी स्त्रीरोगतज्ञा मार्फत करण्यात आली होती. महापालिका क्षेत्रात कोविड रुग्णालयात महिलेची सुखरुप प्रसुती होण्याची ही पहिलीच घटना आहे. नवजात बालकाचे वजन कमी असल्यामुळे त्यास लहान मुलांच्या रुग्णालयात (NICU) दाखल करण्यात आले आहे. सदर गंभीर असलेल्या महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती आर्ट गॅलरी, लाल चौकी येथील कोविड हॉस्पिटलमधील डॉ. अमित गर्ग, डॉ. मुशिर, डॉ. संदिप इंगळे इ. च्या देखरेखीखाली झाली.