डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; अल्पवयीन मुलगाही झाला जखमी

By सचिन सागरे | Updated: June 23, 2024 17:16 IST2024-06-23T17:16:23+5:302024-06-23T17:16:45+5:30

याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी टेम्पोच्या चालकाला ताब्यात घेतले आहे.

Delivery boy dies in collision with tempo in Dombivli | डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; अल्पवयीन मुलगाही झाला जखमी

डोंबिवलीत टेम्पोच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; अल्पवयीन मुलगाही झाला जखमी

डोंबिवली : पिकअप टेम्पो चालवणाऱ्या क्लीनरने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेत एका खाजगी कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या सौरभ रतनकुमार यादव (१९, रा. खोणीगाव) याचा मृत्यू झाला. तर, एक अल्पवयीन मुलगा जखमी झाला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

शनिवारी रात्री ९ च्या सुमारास गाड्या धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची वाहतूक करणारा पिकअप टेम्पो चालकाने आपला क्लीनर आतिश जाधव याला चालवायला दिला. वाहन चालविण्याचा कोणताही परवाना नसलेल्या आतिशने पलावा डाऊन टाऊन परिसरात सायकल चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला धडक दिली. या धडकेत अल्पवयीन मुलगा जखमी झाला. तसेच, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या सौरभ याच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली. या धडकेत सौरभचा मृत्यू झाला. अपघाता दरम्यान क्लिनरचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या आठ ते नऊ दुचाकींचे नुकसान झाले. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Delivery boy dies in collision with tempo in Dombivli