Coronvirus Vaccine : कल्याण डोंबिवलीत शुक्रवारीही लसीकरण नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 23:41 IST2021-07-01T23:41:11+5:302021-07-01T23:41:41+5:30

राज्य शासनाकडून लसी उपलब्ध झाल्या नसल्याची माहिती. 

Coronvirus Vaccine No vaccination on Friday in Kalyan Dombivali | Coronvirus Vaccine : कल्याण डोंबिवलीत शुक्रवारीही लसीकरण नाही

Coronvirus Vaccine : कल्याण डोंबिवलीत शुक्रवारीही लसीकरण नाही

ठळक मुद्देराज्य शासनाकडून लसी उपलब्ध झाल्या नसल्याची माहिती. 

शासनाकडून लससाठा उपलब्ध न झाल्यामुळे कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात शुक्रवारी  महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची आकडेवारी दिलासादायक असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरण मोहीम वेगानं राबविण्याची गरज  निर्माण झाली आहे. 

या महिन्यात सातव्यांदा अपुऱ्या लशीच्या  साठ्यामुळे लसीकरण  बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे. एकीकडे शेजारील ठाणे आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात लसीकरण प्रक्रिया वेगाने सुरू असताना कल्याणडोंबिवली मध्ये मात्र लसीकरण प्रक्रिया वारंवार   बंद ठेवावी लागत आहे.  

त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत असून  वरिष्ठ पातळीवर लसीचा पुरेसा साठा उपलब्ध व्हावा याकरिता प्रयत्न करावे अशी अपेक्षा कल्याण  डोंबिवलीकर व्यक्त करत आहेत. त्यामुळे लसपुरवठयाबाबत सत्ताधारी कल्याण डोंबिवलीकडे लक्ष देऊन येथील नागरिकांना दिलासा देतात का? ते पाहावे लागेल.

Web Title: Coronvirus Vaccine No vaccination on Friday in Kalyan Dombivali