कोरोना नियम सर्वांना सारखेच; मग राजकारणी असो वा सामान्य नागरिक-  श्रीकांत शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:35 PM2021-08-19T16:35:15+5:302021-08-19T16:36:04+5:30

आपल्याकडून कोरोना पसरवला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे.

Corona rules are the same for everyone, be it politicians or ordinary citizens - Shivsena MP Shrikant Shinde | कोरोना नियम सर्वांना सारखेच; मग राजकारणी असो वा सामान्य नागरिक-  श्रीकांत शिंदे 

कोरोना नियम सर्वांना सारखेच; मग राजकारणी असो वा सामान्य नागरिक-  श्रीकांत शिंदे 

Next

कल्याण- राजकारणी व्यक्ती असो की सर्वसामान्य, कोरोनाचे नियम हे सर्वांना सारखे आहेत. आणि ते नियम पाळून सर्व गोष्टी करणे आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी निघणाऱ्या भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

आपल्याकडून कोरोना पसरवला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोरोना नियमांमध्ये कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये. मग त्यात लोकप्रतिनिधी असोत की राजकीय नेते किंवा मग आम्ही असू दे. कोरोना नियम मोडले तर आमच्यावरही कारवाई झाली पाहीजे अशी अपेक्षा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांबाबत बोलताना केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व ठेकेदार  बोगस असून  हा ठाणे जिल्ह्यासाठी एक शाप आहे असे  विधान केले होते. या विधानाला शिंदे यांनी उत्तर देत 

पाटील हे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघाबाबत बोलता आहेत की आपल्या मतदारसंघातील रस्त्याबाबत बोलत आहेत हे माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला. आपल्या मतदारसंघात कल्याण - शिळ रोडचे काम प्रगतीपथावर असून पलावा उड्डाणपूल, काटई उड्डाणपूल यांची कामेही मंजूर झाली आहेत. मोठ्या गतीने रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय 380 कोटी रुपये कल्याण डोंबिवली, एमआयडीसीतील रस्त्यांसाठी मिळालेले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अर्थातच राजकीय पक्षांच्या जाहीर कार्यक्रमांचे पीक येणार ही बाब अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना येणाऱ्या काळात कशाप्रकारे सामाजिक भान राखत कोरोनां नियमांचे पालन करते हे देखील पाहावं लागेल.

Web Title: Corona rules are the same for everyone, be it politicians or ordinary citizens - Shivsena MP Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app