उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात; आयुक्तांनी तातडीने काढली निविदा 

By मुरलीधर भवार | Published: March 13, 2023 06:58 PM2023-03-13T18:58:23+5:302023-03-13T18:59:00+5:30

उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी तातडीने निविदा काढून एका कंत्रटदाराची नियुक्ती केली आहे. 

 Commissioner Dr. Ulhas river basin for removal of water birds. Bhausaheb Dangde has immediately issued a tender and appointed a contractor | उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात; आयुक्तांनी तातडीने काढली निविदा 

उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यास सुरुवात; आयुक्तांनी तातडीने काढली निविदा 

googlenewsNext

कल्याण : उल्हास नदी पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी तातडीने निविदा काढून एका कंत्रटदाराची नियुक्ती केली आहे. दोन बोटीच्या सहाय्याने कंत्राटदाराने मनुष्यबळाचा वापर करीत जलपर्णी काढण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. 

नदीच्या पात्रात सांडपाणी मिसळत असल्याने नदी पात्रात जलपणी उगवते. ही जलपर्णी आरोग्यास  हानीकारक आहे. नदी प्रदूषणाच्या विरोधात उल्हास नदी बचाव कृती समितीकडून पाठपुरावा सुरु आहे. त्याचबरोबर मी कल्याणकर संस्थेचे प्रमुख नितीन निकम यांनी जलपर्णी काढून नदीचे प्रदूषण रोखण्याकरीता वारंवार नदी पात्रात बसून उपोषण केले आहे. त्यांनी पुन्हा उपोषणाचा इशारा दिला. तसेच जिल्हाधिका:यांची भेट घेतली. त्या पाठोपाठ ९  मार्च रोजी आयुक्त दांगडे यांनी प्रत्यक्ष नदीच्या ठिकाणी भेट घेऊन जलपर्णीची पाहणी केली केली. ही समस्या लक्षात घेतात. आयुक्तांनी तातडीने निविदा काढली. 

त्या ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करीत जलपर्णी काढण्याकरीता कंत्रटदार नेमला. कंत्रटदाराच्या माध्यमातून मनुष्यबळाचा वापर करीत जलपर्णी काढण्याच्या कामाला आजपासून सुरुवात केली गेली आहे. कंत्राटदाराने कामगारांना दोन बोटी उपलब्ध करुन दिल्या आहेत. आयुक्तांनी तत्परतेने निर्णय घेतल्याने निकम यांनी आयुक्तांचे आभार मानले आहे. यांत्रिक पद्धतीनेही जलपर्णी काढण्याचा पर्याय निवडला जावा. तसेच नदी आणि नाल्याचे प्रदूषण रोखण्या करीता बायो सॅनिटायझर इको चीपचा वापर करण्यात यावा हा पर्याय देखील सुचविला आहे. आयुक्तांनी सीएसआर फंडातून बायो सॅनिटायझर इको चीप वापरण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव जलतज्ञ गुणवंत पाटील आणि निकम यांच्याकडून मागविले आहे. त्याचा प्रस्ताव प्राप्त हाेताच पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

 

Web Title:  Commissioner Dr. Ulhas river basin for removal of water birds. Bhausaheb Dangde has immediately issued a tender and appointed a contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण