शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 5:23 PM

विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण.

ठळक मुद्देविविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

"कल्याण-स्कायवॉक फेरीवाला मुक्त हा महत्त्वाचा विषय आहे. ठाण्यात मध्यंतरती जी घटना घडली. महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली आहे. त्यात महिला पोलीस देखील आल्या. जो कोणी कायदा हातात घेत असेल त्याच्या बाबतीत दया माया दाखवून चालणार नाही. फेरीवाल्यांच्या उच्छाद आटोक्यात आणण्यासाठी कायदा राबवावा लागेल," असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवार केले.

कल्याणडोंबिवली महापालिकेच्या विविध विकास कामांचे ऑनलाइन लोकार्पण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाटय़गृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास ऑनलाईनद्वारे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना आमदार रविंद्र फाटक, विश्वनाथ भोईर, भाजप आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस भाजप आमदार चव्हाण यांनी व्यथा मांडली. "मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासाकडे लक्ष द्यावे. निधी द्यावा. मंदिरे उघडी करावी," असे ते म्हणाले. या मुद्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता आरोग्याची मंदिरे उभारणे गरजेचे आहे." चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारत माता की जयच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आम्ही सुद्धा घोषणा देतो. मात्र ज्या भारत मातेच्या घोषणा दिल्या जातात. त्याच भारत मातेची मुले सोयी सुविधांपासून वंचित राहणार असतील तर केवळ घोषणा देऊन काय उपयोग, असा प्रश्न उपस्थित केला. कल्याण डोंबिवलीचा विकासासाठी काय हवे आहे. एकदा या आणि बसा पूल, रस्ते, रुग्णालय काय हवे आहे. जनतेच्या सोयी सुविधांसाठी सर्व काही तयारी करण्याची तयारी आहे असे मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केले.

६५०० कोटीचा बॅकलॉग कशामुळे राहिला..?आमदार चव्हाण यांनी बॅकलॉगचा मुद्दा यादरम्यान उपस्थित केला. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण डोंबिवलीच्या विकासासाठी साडे सहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले होते. हा बॅकलॉग कशामुळे राहिला असा सवालही मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीस यांचा नामोल्लेख न करता उपस्थित केला.

कोपर रेल्वे उड्डाणपूल, रुक्णीबाई रुग्णालय प्राणवायू प्रकल्प, सावळाराम क्रीडा संकुल प्राणवायू प्रकल्प, शास्त्रनगर रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, नागरी आरोग्य केंद्र, जैव विविधता उद्दान, महिलांसाटी तेजस्वीनी बस आणि अग्नीशमन केंद्र या कामाचे लोकार्पण करण्यात आले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्रीMaharashtraमहाराष्ट्रkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीhawkersफेरीवाले