Citizens from Dombivli had flocked to D- Mart for shopping | डी- मार्टमध्ये भरली जत्रा; डोंबिवलीत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड

डी- मार्टमध्ये भरली जत्रा; डोंबिवलीत नागरिकांची खरेदीसाठी झुंबड

कल्याण: कल्याण- डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 30 एप्रिल पर्यंत  अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंद करण्याचे आदेश देण्यात आलेय. शहरातील किराणा दुकानांमध्ये नियमांचे पालन केल जात असल तरी मोठेखानी मॉलमध्ये सर्व नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. 

शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत विकेंड लॉकडाऊन असल्यानं डोंबिवलीतील डी मार्टमध्ये खरेदीसाठी एकच झुबंड उडाली होती. नियम मोडल्यावर अनेक दुकानं देखील सील करण्यात आली. मग डी मार्ट ला सूट दिली जातेय का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा मॉल वर पोलीस आणि पालिका प्रशासन कारवाई करतात का ते पाहावे लागेल.  

Web Title: Citizens from Dombivli had flocked to D- Mart for shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.