टिटवाळयात नदीत बुडलेल्या तरुणाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 20:06 IST2021-07-31T20:05:12+5:302021-07-31T20:06:21+5:30

तीन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास टिटवाळा परिसरात राहणारा अतिष पाटील हा तरुण काळू नदीत त्याच्या दोन मित्रांसोबत पोहण्यास गेला होता.

The body of a youth drowned in the river at Titwala was found in a creek in Dombivali | टिटवाळयात नदीत बुडलेल्या तरुणाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत सापडला

टिटवाळयात नदीत बुडलेल्या तरुणाचा मृतदेह डोंबिवलीतील खाडीत सापडला

लोकमत न्यूज नेटवर्क : कल्याण 

तीन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास टिटवाळा परिसरात राहणारा अतिष पाटील हा तरुण काळू नदीत त्याच्या दोन मित्रांसोबत पोहण्यास गेला होता. आतिशला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला होता. याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कळवले मात्र त्याचा अतिष सापडला नाही.

अखेर शुक्रवारी रात्री एक मृतदेह काही नागरिकांना  डोंबिवली देवीचा पाडा येथील खाडीत तरंगताना आढळला. याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटना स्थळी धाव घेत मृतदेह पाण्याबाहेर काढला. विष्णू नगर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु केलं

सकाळच्या सुमारास या मृतदेहाची ओळख पटली. अतिषच्या नातेवाईकांनी हा मृतदेह अतिषचा असल्याची खात्री केली. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The body of a youth drowned in the river at Titwala was found in a creek in Dombivali