भाजपने भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहूंच्या प्रतिमेला हाणले जोडे

By अनिकेत घमंडी | Updated: December 11, 2023 17:21 IST2023-12-11T17:20:49+5:302023-12-11T17:21:47+5:30

साहू यांच्या घर व कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यांत आतापर्यंत ३१८ कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली.

BJP tarnished the image of corrupt Congress MP Dheeraj Sahu | भाजपने भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहूंच्या प्रतिमेला हाणले जोडे

भाजपने भ्रष्टाचारी काँग्रेस खासदार धीरज साहूंच्या प्रतिमेला हाणले जोडे

डोंबिवली: काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याकडे ३१८ कोटींहून अधिक रोख रक्कम सापडल्याच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या वतीने कल्याण, डोंबिवलीत सोमवारी इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे  निषेध आंदोलन करण्यात आले. 

भाजपचे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष विषु।पेडणेकर यांच्या  उपस्थितीत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कॉंग्रेसच्या निषेधाच्या घोषणा देऊन साहू यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

साहू यांच्या घर व कार्यालयांवर टाकलेल्या छाप्यांत आतापर्यंत ३१८ कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या नोटा मोजताना मशिनही बिघडली. या प्रकरणात साहूंविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी महिला मोर्चाच्या वतीने मनीषा राणे यांनी केली.

गरिबीचा नारा देणाऱ्या काँग्रेसने थोडी तरी लाज बाळगावी, अशी प्रतिक्रिया महिला मोर्चाचे अध्यक्ष मितेश पेणकर यांनी व्यक्त केली. तर या प्रकरणामुळे कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचार हे सिद्ध झाले आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये कॉंग्रेसचे हात बरबटलेले आहेत, अशा शब्दात भाजप ओबीसी सेलचे प्रदेश सचिव शशिकांत कांबळे यांनी कॉंग्रेसवर टीका केली.

Web Title: BJP tarnished the image of corrupt Congress MP Dheeraj Sahu