कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांचे मोबाईल, पाकीट चोरणारे ४ चोरटे गजाआड
By मुरलीधर भवार | Updated: August 23, 2023 14:57 IST2023-08-23T14:53:54+5:302023-08-23T14:57:35+5:30
अतुल वाघमारे, विशाल शिखरकर, राजेश यादव आणि गाडे अशी या चार चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल आणि रोकड हस्तगत केली आहे.

कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांचे मोबाईल, पाकीट चोरणारे ४ चोरटे गजाआड
कल्याण-कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान प्रवाशांची नजर चुकवून त्यांचे मोबाईल आणि पाकीट चोरणाऱ्या चार सराईत चोरट्यांना कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. अतुल वाघमारे, विशाल शिखरकर, राजेश यादव आणि गाडे अशी या चार चोरट्यांची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेले मोबाईल आणि रोकड हस्तगत केली आहे.
कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान गेल्या महिन्याभरापासून लोकलने प्रवास करणाऱ्या तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वेची वाट बघणार्या प्रवाशांचे मोबाईल पाकीट चोरी होण्याच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे पोलिसांनी विविध पथके तयार करत कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान गस्ती वाढवल्या. यादरम्यान कल्याण ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांचे मोबाईल व पाकीट लंपास करणाऱ्या चार चोरट्यांना अटक करण्यात रेल्वे पोलिसांना यश आले. पोलिसांनी चार चोरट्यांना अटक केली आहे. हे चारही जण सराईत चोरटे आहे. आधी देखील त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.