लाडक्या बैलानेच घेतला मालकाचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:02 IST2024-12-22T07:02:04+5:302024-12-22T07:02:50+5:30
सरावासाठी नेताना बैलाने केलेल्या हल्ल्यात मालकाचाच मृत्यू

लाडक्या बैलानेच घेतला मालकाचा जीव
बदलापूर: सरावासाठी नेताना बैलाने केलेल्या हल्ल्यात मालकाचाच मृत्यू झाल्याची घटना बदलापुरात घडली. विजय म्हात्रे, असे त्याचे नाव आहे. बदलापूर पश्चिमेतील वालिवली भागात राहणारे विजय म्हात्रे हे कराटेपटू आहेत. त्यांना स्केटिंगची आवड होती. बदलापूरच्या एका खासगी शाळेत ते क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना बैलांच्या शर्यतीची आवड होती. त्यांनी तीन वर्षांपूर्वी बैल खरेदी केला होता. या बैलाची ते पोटच्या लेकाप्रमाणे काळजी घेत होते.
बैलाच्या दोरीत पाय अडकला
मात्र, दोन दिवसांपूर्वी याच बैलाने त्यांचा घात केला. उल्हास नदीकिनारी बैलाला घेऊन जात असताना बैलाच्या दोरीत त्यांचा पाय अडकला. त्यानंतर बैलाने त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भयानक होता की, त्यात म्हात्रे यांचा मृत्यू झाला.