ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचीही एकनाथ शिंदेना साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 06:53 IST2022-07-09T06:52:19+5:302022-07-09T06:53:11+5:30

उद्धव ठाकरे यांना सासरवाडीच्या मंडळींचा ‘दे धक्का’

after Thane Navi Mumbai former corporator of Kalyan Dombivali also accompanied maharashtra cm Eknath Shinde | ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचीही एकनाथ शिंदेना साथ

ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण डोंबिवलीतील माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचीही एकनाथ शिंदेना साथ

कल्याण : ठाणे, नवी मुंबईपाठोपाठ कल्याण - डोंबिवली महापालिकेतील ४० माजी नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला पाठिंबा दिला. शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन निवासस्थानी कल्याण-डोंबिवलीतील माजी नगरसेवकांची बैठक झाली.

ठाणे, नवी मुंबईतील नगरसेवक हे शिंदे गटात सामील झाले होते. गुरुवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण - डोंबिवली महापालिकेतील ४० माजी नगरसेवक आणि काही पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. ठाकरे यांची सासरवाडी डोंबिवलीतील असून तेथील माजी नगरसेवकांनी त्यांना धक्का दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी झाली होती बैठक
दोनच दिवसापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची भेट घेऊन कल्याणच्या कोळसेवाडी शिवसेना शाखेत बैठक घेतली होती. या बैठकीला शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर लागलीच शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत ४० माजी नगरसेवकांनी आपण शिंदे यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले.

Web Title: after Thane Navi Mumbai former corporator of Kalyan Dombivali also accompanied maharashtra cm Eknath Shinde