डोंबिवली एमआयडीसीत गुलाबी रस्त्यानंतर आता निळा रस्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 14:45 IST2020-11-27T14:44:20+5:302020-11-27T14:45:51+5:30
Pollution in Dombivali: 8 महिन्यांपूर्वी केमिकलमुळे रस्ता गुलाबी झाल्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली होती.

डोंबिवली एमआयडीसीत गुलाबी रस्त्यानंतर आता निळा रस्ता
डोंबिवलीएमआयडीसीतप्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नेहमी असते. 8 महिन्यांपूर्वी केमिकलमुळे रस्ता गुलाबी झाल्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली होती. स्वतः पाहणी करून प्रशासनाला आणि कंपनी मालकाला ताकीद आणि सूचना केली होती. मात्र अनलॉकमध्ये कंपन्या सुरू झाल्या नंतर परत केमिकल मिश्रित पाणी रस्त्यावर वाहू लागले आहे.
यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. एमआयडीसी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने हा प्रकार घडत आहे. एमआयडीसी परिसरातील कल्याण शीळ रोडला लागून असलेल्या सर्व्हिस रोडवर निळ्या रंगाचे पाणी पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अखेर प्रशासन कधी लक्ष देणार.