शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात होतेय कुष्ठरुग्णांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 23:41 IST

नऊ महिने मानधनाविना : पाच दिवसांत देण्याचे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आश्वासन

कल्याण : केडीएमसी हद्दीतील कुष्ठरुग्णांना मनपा प्रशासनातर्फे दरमहिना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते, परंतु मागील नऊ महिने त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे कोरोनाच्या काळात त्यांची परवड होत आहे. या प्रश्नाबाबत मनपा प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही मानधनाला होणारा विलंब चर्चेचा विषय ठरला आहे.

पूर्वेतील हनुमाननगरमध्ये कुष्ठरुग्णांची १६० कुटुंबे आहेत. यातील काही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, तर सध्या येथे १०७ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांना दररोज मलमपट्टी करावी लागते. यातील ६७ रुग्णांना दरमहिना अडीच हजार रुपये मानधन दिले जाते. कुष्ठरुग्णांना मानधन देणारी केडीएमसी राज्यातील पहिली महापालिका आहे. आयुक्त रामनाथ सोनवणे आणि महापौर कल्याणी पाटील यांच्या कार्यकाळात हा मानधनाचा निर्णय अंमलात आणण्यात आला. कुष्ठरुग्णांना मानधन मिळावे, यासाठी कुष्ठमित्र गजानन माने आणि माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी केला होता. अठरा विश्वे दारिद्र्य, त्यात उपजीविकेचे कोणतेच मार्ग उपलब्ध नव्हते. त्यामुळे मनपाकडून मिळणारे मानधन कुष्ठरुग्णांसाठी मोठा आधार ठरले आहे. मात्र, मागील सप्टेंबर, २०२० ते आजपर्यंत ते मानधनापासून वंचित आहेत.सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे मानधनाअभावी कुष्ठरुग्णांची परवड होत आहे. माजी नगरसेवक शिंदे यांनी कुष्ठरुग्णांना लवकरात लवकर मानधन मिळावे, याकडे मनपाचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि आरोग्य विभागाचे लक्ष वेधले आहे. हनुमाननगर कुष्ठसेवा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड यांनी सोमवारी आरोग्य विभागात जाऊन मानधनाबाबत चौकशी केली असता नऊपैकी सहा महिन्यांचे मानधन येत्या चार ते पाच दिवसांत तातडीने दिले जाईल, अशी माहिती त्यांना देण्यात आली.

कुष्ठरुग्ण लसीपासूनही वंचितnहनुमाननगरमधील सुमारे १५० कुष्ठरुग्ण ४५च्या वरील वयोगटांतील आहेत. फेब्रुवारीपासून ४५ व त्यावरील वयोगटांसाठी कोविड लस देण्यास सुरुवात झाली, परंतु अद्याप हनुमाननगरमधील एकाही कुष्ठरुग्णाला लस दिली गेलेली नाही. बहुतांश रुग्ण हे बहुविकलांग आहेत. nत्यांच्यावर जखमा असल्याने त्यांना रांगेत उभे राहणे शक्य नाही. त्यामुळे हनुमाननगरमध्ये विशेष लसीकरणाची मोहीम राबवावी, अशी मागणी हनुमाननगर कुष्ठसेवा संस्थेने केडीएमसीकडे केली आहे. दरम्यान, आधीच लसीचा तुटवडा असल्याने कुष्ठरुग्णांसाठी लसीकरण मोहीम राबविणे आव्हान ठरणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका