सासरच्या मंडळींना केली शिवीगाळ; मेहुण्याने केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या

By प्रशांत माने | Updated: May 4, 2023 20:14 IST2023-05-04T20:14:18+5:302023-05-04T20:14:39+5:30

खंबाळपाडा परिसरातील एका चाळीत रमेश आणि मारीकली हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात.

Abused in laws Brother in law killed sister's husband | सासरच्या मंडळींना केली शिवीगाळ; मेहुण्याने केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या

सासरच्या मंडळींना केली शिवीगाळ; मेहुण्याने केली बहिणीच्या नवऱ्याची हत्या

डोंबिवली: दारूच्या नशेत सासरच्या मंडळींना शिवीगाळी करणाऱ्या बहिणीचा पती मारीकली रामास्वामी तेवल (वय ४८) याची मेहुणा रमेश वेलास्वामी तेवल (वय २९) याने छातीत चाकू खूपसून हत्या केल्याची घटना पूर्वेकडील खंबाळपाडा परिसरात गुरूवारी दुपारी घडली.

खंबाळपाडा परिसरातील एका चाळीत रमेश आणि मारीकली हे दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. राहतात. दोघेही इडली विक्रेतेे आहेत. मारीकलीला दारू पिण्याचे व्यसन होते. गुरूवारी दुपारी दारू पिऊन तो शेजारीच राहत असणाऱ्या सासरच्या मंडळींकडे गेला. दारू प्यायलाने ताळमेळ नसलेल्या मारीकलीने सासरच्या लोकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी घरात असलेल्या मोठया मेहुण्याने मारीकली याला समजवण्याचा हेतून त्याला घराबाहेर नेले. तरीही मारीकलीने शिवीगाळी करणे सुरूच ठेवले. 

याचा राग घरातील धाकटा मेव्हणा रमेश याला आला. त्याने घराबाहेर असलेल्या मारीकलीच्या छातीत चाकू खूपसला आणि तेथून पसार झाला. दरम्यान चाकू खूपसल्याने मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झालेल्या मारीकलीला नजीकच्या रुग्णालयात उपाचारार्थ नेण्यात आले. पण तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून हत्या करून पसार झालेल्या रमेशचा शोध सुरू असल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरीक्षक अजय आफळे यांनी दिली.
 

Web Title: Abused in laws Brother in law killed sister's husband