डोंबिवलीतील रील स्टारचा आणखी एक कारनामा; बलात्काराचा गुन्हा दाखल, आरोपी पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:50 IST2025-04-02T18:50:12+5:302025-04-02T18:50:33+5:30

डोंबिवलीमध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप रील स्टार सुरेश पाटील याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

A reel star has been accused of sexually assaulting a young woman from Pune in Dombivli | डोंबिवलीतील रील स्टारचा आणखी एक कारनामा; बलात्काराचा गुन्हा दाखल, आरोपी पसार

डोंबिवलीतील रील स्टारचा आणखी एक कारनामा; बलात्काराचा गुन्हा दाखल, आरोपी पसार

डोंबिवलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  येथील चर्चित रील स्टार आणि बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील याच्या विरोधात बलात्काराचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील एका तरुणीला मुंबई एअरपोर्टवर एअरहोस्टेसची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्याने तिच्यावर बंदुकीच्या धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  आरोपीने पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून तिच्यावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. सदर गुन्हा दाखल होताच सुरेंद्र पाटील पसार झाला असून, मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. डोंबिवलीतील वादग्रस्त रील स्टार सुरेंद्र पाटील याच्यावर आणखी एका गंभीर गुन्ह्याची नोंद झाला आहे. पुण्यातील एका तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेंद्र पाटील याने तिला मुंबई एअरपोर्टवर एअरहोस्टेसची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि तिला कागदपत्रांसाठी डोंबिवलीतील आपल्या ऑफिसमध्ये बोलावले. तरुणी ऑफिसमध्ये पोहोचताच त्याने तिला एका खोलीत नेले आणि बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तसेच, हा प्रकार कुठेही सांगितल्यास तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. 

बापरे! जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

काही दिवसांनी, पुन्हा कागदपत्रांसाठी बोलावून त्याने बलात्काराचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर तिच्यावर चोरीचा आळ लावत नग्न करून झडती घेण्याच्या बहाण्याने अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सुरेंद्र पाटीलच्या ड्रायव्हरने देखील अश्लील कृत्य केल्याचा आरोप केला आहे. सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी सुरेंद्र पाटील सध्या फरार आहे. गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर रील स्टार म्हणून चर्चेत असलेल्या सुरेंद्र पाटीलच्या या गंभीर कृत्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. याआधीही तो पोलिसांच्या खुर्चीत बसून रील बनवल्यामुळे वादात सापडला होता. मात्र, आता त्याच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाला आहे.

Web Title: A reel star has been accused of sexually assaulting a young woman from Pune in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.