विवाहित महिलेची अनैतिक संबंधातून हत्या; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

By प्रशांत माने | Updated: December 14, 2022 19:31 IST2022-12-14T19:31:00+5:302022-12-14T19:31:21+5:30

डोंबिवली येथे विवाहीत महिलेची अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आली. 

 A married woman was murdered in Dombivli due to an immoral relationship   | विवाहित महिलेची अनैतिक संबंधातून हत्या; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

विवाहित महिलेची अनैतिक संबंधातून हत्या; आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर

डोंबिवली : विवाहीत महिलेची अनैतिक संबंधातून प्रियकराने दिवसाढवळया हत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ ते ११.१५ दरम्यान डोंबिवली पुर्वेतील मानपाडा, पाईपलाईन रोड टाटा नाका परिसरातील एका घरात घडली. हत्या झालेली महिला ४० वर्षाची आहे. तीची हत्या केल्यानंतर आरोपी स्वत: मानपाडा पोलिस ठाण्यात हजर झाला. संदीप अहिरे (वय ३८) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंद झाला आहे.

विवाहीत महिलेचे आणि संदीपचे अनैतिक संबंध होते. दोघेही टाटा नाका परिसरातच राहतात. तिच्या घरात सकाळी ११ च्या सुमारास ते दोघे असताना त्यांच्यात  वाद झाला. यात संदीपने ब्लेड सारख्या धारदार वस्तूने तीच्या गळयावर वार केले. यात गंभीर दुखापत होऊन तीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान दुपारी दोनच्या सुमारास संदीपने स्वत: मानपाडा पोलिस ठाणे गाठले आपण हत्या केल्याची माहीती तेथील पोलिसांना दिली. पोलिस हे ऐकताच हैराण झाले. दरम्यान घटनेची शाहनिशा करण्यासाठी मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळयात तीच्या घरात आढळून आला. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांच्या मार्गर्शनाखाली पुढील तपास सुरु  असल्याची माहीती सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कुराडे यांनी दिली. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


 

Web Title:  A married woman was murdered in Dombivli due to an immoral relationship