धक्कादायक! डोंबिवलीनंतर आता कल्याण हादरलं; ८ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 09:47 AM2021-09-24T09:47:17+5:302021-09-24T09:47:49+5:30

कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीत राहणारी पीडित आठ वर्षीय मुलगी याच परिसरातील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जाते.

An 8-year-old girl has been tortured by a teacher in Kalyan; The accused has been arrested by the police | धक्कादायक! डोंबिवलीनंतर आता कल्याण हादरलं; ८ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार

धक्कादायक! डोंबिवलीनंतर आता कल्याण हादरलं; ८ वर्षांच्या मुलीवर शिक्षकाचा लैंगिक अत्याचार

Next

कल्याण: डोंबिवलीत एका अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आल्यानंतर कल्याणमध्ये आणखी एका आठ वर्षीय मुलीवर खासगी शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपी मुदर तालवाला याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. 

कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीत राहणारी पीडित आठ वर्षीय मुलगी याच परिसरातील एका शिक्षिकेकडे शिकवणीला जाते. काही दिवसांपूर्वी शिक्षिका माहेरी गेली होती. त्यामुळे तिचा पती शिक्षक मुदर तालवाला हा मुलांची शिकवणी घेत होता. दरम्यान, काही दिवसांपासून पीडित मुलगी शिकवणीला जायला तयार नव्हती. तिच्या आईने शिकवणीला जायला सांगितले असता, ती रडायला सुरुवात करायची. त्यामुळे तिच्या आईला संशय आला. 

आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, मुलीने घडलेला प्रकार आईला हावभाव करुन दाखविला. त्यावरून आपल्या मुलीसोबत काय प्रकार घडला, हे आईला समजून चुकले. याबाबतची माहिती तिच्या आईने बाजारपेठ पोलिसांना दिली. पोलिसांनी गंभीर दखल घेत ४२ वर्षीय शिक्षक मुदर तालवाला याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली.

Web Title: An 8-year-old girl has been tortured by a teacher in Kalyan; The accused has been arrested by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app