शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये लग्न सोहळ्यात ७०० जण विनामास्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:51 IST

आयोजकांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : कोरोना वाढत असतानाही बेफिकिरी कायम

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या गुणाकाराच्या पटीत वाढत असल्याने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सोमवारपासून कडक निर्बंध लागू केले असताना कल्याण पूर्व भागात एका लग्न सोहळ्य़ात ७०० पेक्षा जास्त लोक विनामास्क सहभागी झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. पोलिसांनी लग्न सोहळ्याच्या आयोजकांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

कल्याण पूर्व भागातील ६० फूट रस्त्यालगत  गॅस कंपनीशेजारी एक मोठ्या स्वरूपाचा लग्नसोहळा सुरू आहे. त्यात ७०० पेक्षा जास्त लोक सहभागी झाल्याची माहिती महापालिकेचे प्रभाग अधिकारी वसंत भोंगाडे यांना मिळताच प्रभाग अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. लग्न सोहळ्यात सहभागी झालेल्या लोकांनी मास्क घातले नव्हते. तसेच सोशल डिस्टन्सिंग न पाळता वावरत असल्याचे दिसून आले. कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याबद्दल प्रभाग अधिकारी भोंगाडे यांच्या तक्रारीच्या आधारे कोळसेवाडी पोलिसांनी लग्न सोहळ्याचे आयोजक राजेश यशवंत म्हात्रे आणि महेश कृष्णा राऊत या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत बुधवारी कोरोनाचे नवे ३९२ रुग्ण आढळून आले होते. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने महापालिका प्रशासनाने बुधवारपासून विविध प्रकारचे निर्बंध घातले आहेत. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली. त्याचवेळी लग्न सोहळ्य़ात ७०० पेक्षा जास्त लोकांना जमवून गर्दी करून कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्याची घटना बुधवारी सायंकाळी प्रशासनास निदर्शनास आली. महापालिकेने जारी केलेल्या निर्बंधानुसार लग्न सभारंभात ५० पेक्षा जास्त लोकांचा सहभाग असू नये, असा नियम आहे. लग्न सोहळे आणि पार्ट्यांमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले होते. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव महापालिका हद्दीत सुरू झाला, तेव्हा डोंबिवलीतील लग्न सोहळ्यात सहभागी झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. तोच प्रकार पुन्हा दिसून आला आहे.  

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे