Shivaji University, Aurangabad University, four teams in the next round; Western divisional kabaddi competition | शिवाजी विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठासह चार संघ पुढील फेरीत ; पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा
शिवाजी विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठासह चार संघ पुढील फेरीत ; पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा

ठळक मुद्देआजपासून रंगणार साखळी फेरी

कोल्हापूर : पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धेत बुधवारी शिवाजी विद्यापीठ, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि युनिर्व्हेसिटी आॅफ कोटा या संघांनी पुढील फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत आज, शुक्रवारपासून साखळी फेरीतील सामने रंगणार आहेत.

विद्यापीठातील लोककला केंद्रात सकाळच्या सत्रात शिवाजी विद्यापीठाने गोवा विद्यापीठावर ४२ गुणांनी आणि भोपाळच्या राजीवगांधी प्रौऔद्योगिकी विश्वविद्यालयावर ३१ गुणांनी विजय मिळविला. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जबलपूरच्या राणी दुर्गावती विश्वविद्यालयाला ४५ गुणांनी पराभूत केले. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने राजस्थानच्या भूपाल नोबेल्स युनिर्व्हेसिटीवर २९ गुणांनी आणि वीरनर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठावर अवघ्या एका गुणाने मात केली. युनिर्व्हेसिटी आॅफ कोटाने ग्वाल्हेरच्या एलएनआयपीईच्या संघाला २८ गुणांनी हरविले.

नागपूर, जळगांवचे आव्हान संपुष्टात
सूरतच्या वीर नर्मदा साऊथ गुजरात विद्यापीठाने जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर दोन गुणांनी निसटता विजय मिळविला. राजीव गांधी प्रौऔद्योगिकी विश्वविद्यालयाने गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाला ४५ गुणांनी पराभूत केले. हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजरात विद्यापीठाला नमवून पुढे आलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला युनिर्व्हेसिटी आॅफ कोटाने २५ गुणांनी हरविले. औरंगबाद विद्यापीठाने संत गागडेबाबा अमरावती विद्यापीठाचा १८ गुणांनी पराभव केला. अशा पद्धतीने नागपूर, जळगांव, गोंडवाना आणि अमरावती विद्यापीठाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.


फोटो (२८११२०१८-कोल-कबड्डी (औरंगाबाद जबलपूर)०१ व ०२ : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात बुधवारी पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ पुरूष कबड्डी स्पर्धेत औरंगबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जबलपूरच्या राणी दुर्गावती विश्वविद्यालयावर ४३ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. (छाया : नसीर अत्तार)
........................................................................................................
लोगो (२८११२०१८-कोल-विद्यापीठ कबड्डी लोगो)
............................................................................................................
(संतोष मिठारी)


Web Title: Shivaji University, Aurangabad University, four teams in the next round; Western divisional kabaddi competition
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.