पुण्याची पराभवाची मालिका कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 02:58 IST2019-08-16T02:58:36+5:302019-08-16T02:58:58+5:30
पुन्हा एकदा सांघिक खेळ करण्यात अपयशी ठरलेल्या पुणेरी पलटण संघाला पराभवाचा धक्का बसला. यो

पुण्याची पराभवाची मालिका कायम
अहमदाबाद : पुन्हा एकदा सांघिक खेळ करण्यात अपयशी ठरलेल्या पुणेरी पलटण संघाला पराभवाचा धक्का बसला. योजनेनुसार खेळ करण्यात आलेले अपयश व सांघिक ताळमेळीचा अभाव यामुळे पुणेकरांना जयपूर पिंक पँथर्सविरुद्ध ३३-२५ असा एकतर्फी पराभव पत्करावा लागला.
एका अरेना स्टेडियममध्ये पुणेकरांकडून पुन्हा निराशाजनक खेळ झाला. नितिन तोमर, सुरजीत सिंग या अनुभवी खेळाडूंचा हरपलेला फॉर्म पुण्यासाठी महागडा ठरला. त्याचवेळी मनजीतने चांगला खेळ केला, मात्र त्याला इतर खेळाडूंकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.
दुसरीकडे, आक्रमक खेळ केलेल्या जयपूरने गुणांचा धडाका लावत पुण्यावर दडपण ठेवले. एकट्या दीपक हूडाने .. गुण मिळवत वर्चस्व राखले. मध्यंतरालाच जयपूरने १७-११ अशी आघाडी घेत सामन्यावरील पकड मजबूत केली.
मध्यंतरानंतर जयपूरने आपल्या खेळात आणखी वेग आणला. यावेळी पुणेकरांना आव्हान निर्माण करण्यातही यश मिळाले नाही. जयपूरने पुण्यावर दोनवेळा लोण चढवून सामना आपल्या बाजूने झुकविला. अखेरच्या काही मिनिटांत पुणेरी बचावफळीने गुण मिळवले, खरे मात्र जयपूरला गाठण्यात त्यांना यश आले नाही.