शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कबड्डी : कुमार गटातून शिव मराठा स्पोर्ट्स क्लबची अंतिम फेरीत धडक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 5:11 PM

शिव मराठा स्पोर्ट्स क्लबने उपांत्य फेरीच्या लढतीत शिवशक्ती क्रीडा मंडळावर २६-१६ असा विजय मिळवला.

मुंबई : शिव मराठा स्पोर्ट्स क्लबने ओम भारत क्रीडा मंडळ आयोजित आमदार-नगरसेवक चषक कबड्डी स्पर्धेतील कुमार गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत त्यांनी शिवशक्ती क्रीडा मंडळ (खार) संघावर २६-१६ असा १० गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले. सुमीत जाधवच्या दमदार चढायामुळे त्यांनी पहिल्या सत्रातच १५-१ अशी मोठी आघाडी घेतली होती आणि तीच निर्णायक ठरली. उत्तरार्धात त्यांच्या सलीम शेख याने आपल्या जोरदार चढायांनी शिव मराठा संघाचा बचाव खिळखिळा केला पण त्याचे हे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत आणि त्यांचे आव्हान उपांत्य फेरीतच आटोपले. महिला गटातून चेंबूर क्रीडा केंद्र आणि ओम नवमहाराष्ट्र मंडळ या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. चेंबूर क्रीडा केंद्र संघाने आक्रमण, बचाव आणि उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या बळावर  सन्मित्र क्रीडा मंडळ विरुद्ध ४४-१४ असा आरामात विजय मिळविला. त्यांच्या भाग्यश्री जाधवने एका चढाईत ४ गुण तर ऋतुजा गोवर्धने हिने एका चढाईत ३ गुणांची कमाई करीत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. सन्मित्र संघातर्फे आरती यादव हिने एका चढाईत ३ गुण मिळविले तर दीपलक्ष्मी लेंगार हिने उत्तम पकडी केल्या. ओम नवमहाराष्ट्र मंडळ आणि वंदे मातरम या दोन संघांमधील लढत अगदीच एकतर्फी ठरली. करिष्मा म्हात्रे आणि ऐजीता यांच्या जोरदार चढाया प्रतिस्पर्धी संघ थोपवू शकला नाही आणि उपांत्य फेरीतील त्यांचा प्रवेश सुकर झाला.

प्रथम श्रेणी पुरुष गटातून जॉली स्पोर्ट्स क्लब आणि उत्कर्ष (भांडूप) या संघांनी उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. जॉली स्पोर्ट्सने अपेक्षेप्रमाणेच सह्याद्री क्रीडा मंडळ (जोगेश्वरी) विरुद्ध ३७-११ असा लीलया विजय मिळविला. नामदेव इस्वलकर आणि विक्रम जाधव यांच्या चढाया आणि अनिकेत पाडलेकर याने केलेल्या अचूक पकडी यांचा त्यात सिंहाचा वाटा होता. सह्याद्रीच्या सौरव पार्टे, भरत करंगुटकर आणि साईराज पाडावे यांनी चांगला खेळ केला. दुसऱ्या लढतीत उत्कर्षने चेंबूर क्रीडा केंद्र विरुद्ध पहिल्या सत्रात ९-१५ असे पिछाडीवर पडूनही दुसऱ्या सत्रात आपला खेळ उंचावत २३-२१ असा निसटता विजय मिळविला. त्यांच्या नितीन घोगळे याने उत्कृष्ट चढाया केल्या तर रोहित गायकवाड याने अचूक पकडी करून दुसऱ्या सत्रात चेंबूर क्रीडा केंद्र संघाला कोंडीत पकडले आणि संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. चेंबूर क्रीडा केंद्राच्या अभय बोरकर याने एका चढाईत ३ बळी टिपले तर सुरज कनोजिया, सागर नार्वेकर,कुणाल पवार यांनीही उत्तम खेळ केला. मात्र संघाचा पराभव टाळण्यात त्यांना अपयश आले.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMaharashtraमहाराष्ट्र