शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातने उतरवली दिल्लीची ‘दबंगगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:21 IST

आक्रमक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाने प्रो-कबड्डी लीगला दणदणीत सुरुवात करताना दबंग दिल्लीचा २६-२० असा धुव्वा उडवला.

हैदराबाद : आक्रमक खेळाचे शानदार प्रदर्शन केलेल्या गुजरात फॉर्च्युनजायंट्स संघाने प्रो-कबड्डी लीगला दणदणीत सुरुवात करताना दबंग दिल्लीचा २६-२० असा धुव्वा उडवला. सांघिक खेळाचे जबरदस्त प्रदर्शन करताना गुजरातने आक्रमण आणि बचाव यांची सुंदर सांगड घातली.गचिबोवली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात इराणी खेळाडू मेराज शेखच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा गुजरातच्या झंझावातापुढे निभाव लागला नाही. सुकेश हेगडेच्या नेतृत्वाखाली खेळणाºया गुजरातने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत दिल्लीच्या आव्हानातली हवा काढली. मेराज शेख अपयशी ठरल्याने दिल्लीवरील दडपण वाढत गेले. यामुळे त्यांच्याकडून अनेक चुका झाल्या आणि त्याचा फायदा घेत गुजरातने धमाकेदार विजयाची नोंद केली. मध्यंतराला गुजरातने १५-५ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले. सुकेशसह राकेश नरवाल व सचिन यांनी आक्रमणात गुजरातला सातत्याने गुण मिळवून दिले. तसेच, इराणचा हुकमी बचावपटू फझेल अत्राचली याने भक्कम पकडींच्या जोरावर दिल्लीची ‘दबंगगिरी’ उतरविण्यात मोलाची कामगिरी केली. गुजरातने दिल्लीवर दोन लोण चढवून आपले वर्चस्व राखले. दिल्लीचा अनुभवी बचावपटू निलेश शिंदेने काही चांगल्या पकडी केल्या, परंतु त्याला इतर सहकाºयांकडून अपेक्षित साथ लाभली नाही. अखेरची दोन मिनिटे असताना दिल्लीने गुजरातवर एक लोण चढवून पुनरागमनाचा प्रयत्न केला. पण, गुजरातकडे मोठी आघाडी असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. (वृत्तसंस्था)यूपीचा तेलगूला दणकायूपी योद्धा संघानेही आपल्या पदार्पणाच्या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद करताना बलाढ्य तेलगू टायटन्सचा ३१-१८ असा फडशा पाडला. सावध सुरुवातीनंतर केलेला आक्रमक खेळ यूपी संघाने अखेरपर्यंत कायम राखत सहज बाजी मारली. मध्यंतराला यूपीने १२-११ अशी नाममात्र आघाडी घेत आपले नियंत्रण राखले. मात्र यानंतर त्यांनी तुफानी खेळ करताना तेलगूच्या आव्हानातली हवा काढली. लीगमधील सर्वात महागडा खेळाडू आणि यूपीचा कर्णधार नितीन तोमरसह मूळचा मुंबईकर रिशांक देवाडिगा यांनी खोलवर चढाया करुन तेलगू संघाला हैराण केले. तसेच महेश गौडचा अष्टपैलू खेळ आणि नीतेश कुमारच्या भक्कम पकडी यूपीच्या विजयात निर्णायक ठरल्या.