शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

फुकटात घरी जाण्यासाठी 'या' मुलाने असा केला जुगाड, पैसेही वाचले अन् भूकही मिटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 14:52 IST

ओबेशने फेसबुक आणि ट्विटरवरुन या घटनेची माहिती शेअर केली आहे.

हैदराबाद - या जगात जुगाड करणारे लोक एकापेक्षा एक सर्रस भेटतील. तुम्हीही कधी ना कधी एक झुगाड केला असेलच. मात्र हैदराबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने Zomato वर असा काही जुगाड केला की तुम्हीही ऐकून थक्क व्हाल. झॉमेटो ही फूड डिलिव्हरी करणारी कंपनी आहे. या झॉमेटोच्या माध्यमातून ओबेश नावाच्या एका मुलाने असं काही केलं ज्याच्यामुळे तो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. 

ओबेशने फेसबुक आणि ट्विटरवरुन या घटनेची माहिती शेअर केली आहे. त्याने सोशल मीडियात लिहिलंय की, रात्रीचे 11.30 वाजले होते. मी इनऑर्बिट मॉल रोडवर रिक्षासाठी थांबलो होतो. मात्र त्या परिसरात एकही रिक्षा मला मिळाली नाही. त्यानंतर मी उबेरवर कार बुक करण्यासाठी गेलो पण त्यावेळी माझ्या घरापर्यंत जाण्यासाठी 300 रुपये भाडे लागेल असं दाखविण्यात आले. मला प्रचंड भूकही लागली होती. त्यावेळी मी झॉमेटो अ‍ॅपमध्ये गेलो त्याठिकाणी माझ्या घराजवळचं फूड शॉप शोधणं सुरु केलं. 

ओबेशने पुढे सांगितले की, मला एक डोसा शॉप माझ्या घराजवळ असल्याचं कळालं. मी झॉमेटॉवरुन डोसा ऑर्डर केला. तुम्हीही विचार कराल की या मुलाला घरी जायचं आहे. रिक्षा मिळत नाही मग हा फूड ऑर्डर कशा देतोय? मात्र ओबेशच्या डोक्यात भलताच विचार सुरु होता. एकाच निशाण्यात दोन पक्षी मारण्याचं त्याने ठरवलं. फूड शॉपवरुन झॉमेटो डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन ओबेशजवळ पोहचला. यानंतर खरा ट्विस्ट समोर आला. ओबेशने डिलिव्हरी बॉयला विचारलं तु पुन्हा त्या दुकानाजवळ चालला आहे का? यावर डिलिव्हरी बॉयने होकार दिल्यानंतर ओबेशने त्याला मला त्या दुकानाजवळ सोड असं सांगितले. त्यावर डिलिव्हरी बॉयही तयार झाला. अशाप्रकारे ओबेशने रिक्षाचे भाडेही वाचविले आणि आरामात डोसा खात घरी पोहचला. 

घराच्या जवळ पोहचल्यानंतर डिलिव्हरी बॉय म्हणाला की, सर प्लीज मला 5 स्टार रेटिंग द्या. मी त्याला बोललो ठीक आहे. त्यामुळे झॉमेटोने मला फ्री राइड दिल्याबद्दल त्यांचे आभार आहे असं ओबेशने पोस्ट केलं. ओबेशची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यावर झॉमेटोनेही रिप्लाय करत सांगितलं की. आधुनिक समस्या सोडविण्यासाठी आधुनिक समाधानाची गरज आहे. तसेच अनेक युजर्स त्याच्या या कल्पनेला जबरदस्त प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे.   

 

टॅग्स :ZomatoझोमॅटोFacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाfoodअन्न