तरूणींच्या रूममध्ये घुसून चोरी करत होता त्यांचे अंडरगारमेंट्स, एका तरूणीने बघितलं आणि....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:11 IST2022-08-09T15:10:30+5:302022-08-09T15:11:19+5:30
किंग टॅमला याप्रकरणी कोर्टाने नुकतीच 6 महिन्यांची तुरूंगावासाची शिक्षा सुनावली. टॅम तरूणींच्या रूममध्ये विना परवानगी घुसण्यासाठी आणि चोरी करण्यात दोषी आढळून आला.

तरूणींच्या रूममध्ये घुसून चोरी करत होता त्यांचे अंडरगारमेंट्स, एका तरूणीने बघितलं आणि....
19 वर्षीय एका तरूणावर लपून-छपून मुलींच्या रूममध्ये शिरण्याचा आणि त्यांच्या अंडरगारमेंट्स चोरी करण्याचा आरोप आहे. जेव्हा तरूणींनी त्याला त्यांच्या रूममधून बाहेर पडताना पाहिलं तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. तेव्हा त्यांनी लगेच पोलिसांनी याची सूचना दिली. ही घटना ब्रिटनच्या मॅनचेस्टरची आहे. चोरीची ही घटना 20 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान घडली होती. त्यावेळी आरोपी टॅम मॅनचेस्टर यूनिव्हर्सिटीचा विद्यार्थी होता.
किंग टॅमला याप्रकरणी कोर्टाने नुकतीच 6 महिन्यांची तुरूंगावासाची शिक्षा सुनावली. टॅम तरूणींच्या रूममध्ये विना परवानगी घुसण्यासाठी आणि चोरी करण्यात दोषी आढळून आला. Minshull Street Crown Court मध्ये सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं की, जेव्हापासून टॅम हॉंगकॉंगहून परत आला, तेव्हापासून त्याला एकटेपणा आणि वेगळेपणा जाणवत होता. तो डिप्रेशनमध्ये गेला होता.
'द मिरर' च्या रिपोर्टनुसार, तरूणींच्या रूममधून सतत त्यांचे अंडरगारमेंट्सची चोरी होत होती. या घटनेने हैराण एका तरूणीने बघितलं की, एक दिवस टॅम तिच्या रूममधून लपून-छपून बाहेर जात होता. नंतर तिने कपाटात अंडरगारमेंट्स चेक केले तर ते गायब होते. हे तिने तिच्या मैत्रिणींना सांगितलं. तेव्हा त्यांच्यासोबतही असंच झाल्याचं समजलं.
तेव्हा तरूणींना विश्वास बसला की, त्यांचे कपडे चोरी होण्यामागे दुसरं कुणी नसून किंग टॅम आहे. त्यांनी फोन करून पोलिसांना याची सूचना दिली. ज्यानंतर टॅमला अटक करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आणि माफी मागितली.
कोर्टात या प्रकरणी सुनावणी झाली. ज्यावेळी टॅमला चोरीच्या दोन प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं. त्याला 6 महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच एक वर्ष सस्पेंडेड तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.