प्रेमात पडले अन् विसरले लग्नाचं वय, व्हायरल झाले पाकिस्तानातील लग्नाचे फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 13:09 IST2020-02-07T13:06:40+5:302020-02-07T13:09:15+5:30
असे म्हणतात की, प्रेमाला वय नसतं. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लोक प्रेमात पडू शकतात. शाळा आणि कॉलेजमधील प्रेम तर फारच कॉमन आहे.

प्रेमात पडले अन् विसरले लग्नाचं वय, व्हायरल झाले पाकिस्तानातील लग्नाचे फोटो!
असे म्हणतात की, प्रेमाला वय नसतं. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लोक प्रेमात पडू शकतात. शाळा आणि कॉलेजमधील प्रेम तर फारच कॉमन आहे. पण कधी एखाद्या कपलने प्रेम होताच वय केवळ १८ असताना लग्न केल्याचं ऐकलं का? कदाचित नसेल ऐकलं. पण पाकिस्तानातील एका कपलने असंच केलंय. १८ वर्षाच्या मुलाचं तेवढ्याच वयाच्या मुलीवर प्रेम झालं आणि दोघांनी फटाफट लग्नही उरकून टाकलं. आता दोघांचेही फोटो व्हायरल झाले आहेत.
१८ वर्षाच्या मुलाचं नाव असद असून त्याचा जन्म मस्कटमध्ये झाला. तर मुलगी पाकिस्तानातील राहणारी असून तिचं नाव निमारा आहे. असद हा मुळचा पाकिस्तानचा आहे. तो त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी पाकिस्तानात गेला आणि तिथेच त्याची भेट निमारासोबत झाली.
पहिल्याच भेटीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मग काय घरापर्यंत विषय गेला आणि वडिलांनी लगेच लग्न करण्यास सांगितले. आधी तर असद यासाठी तयार नव्हता. पण जेव्हा त्याला त्याच्या वडिलांनी सांगितले की, त्यांनी सुद्धा १८व्या वर्षी लग्न केलं होतं तेव्हा असद तयार झाला. मोठ्या धडाक्यात लग्न झालं. आता दोघेही लग्नानंतर मस्कटमध्ये शिक्षण पूर्ण करणार आहेत.
Koi maroo mujy maroo😭😭😭💔 pic.twitter.com/cFHtmf1Cph
— veNom☠️ (@Mr__wafaa) February 3, 2020
लग्नानंतर जसेही दोघांनी सोशल मीडियात व्हिडीओ आणि फोटो शेअर केले लोक त्यांना ट्रोल करू लागले. अनेकांनी त्यांची वयावरून खिल्ली उडवली. पण काही लोकांना दोघांचं समर्थन देखील केलं.