पैसाच पैसा! दुकानदाराने सांगितले आणि तिकीट खरेदी केले, लागली दुसऱ्यांदा ७ करोडची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 18:53 IST2021-07-07T18:49:30+5:302021-07-07T18:53:37+5:30

तुम्ही एकावर एक फ्री ची जाहिरात पाहिलीच असेल. पण समजा तुम्हीला एका लॉटरीवर दुसरी लॉटरी लागली तर तीही तब्बल ७ करोड रुपयांची लॉटरी तर तुम्ही काय कराल?

You may have seen one free ad on another. But suppose you win another lottery on one lottery, that too a lottery of Rs 7 crore | पैसाच पैसा! दुकानदाराने सांगितले आणि तिकीट खरेदी केले, लागली दुसऱ्यांदा ७ करोडची लॉटरी

पैसाच पैसा! दुकानदाराने सांगितले आणि तिकीट खरेदी केले, लागली दुसऱ्यांदा ७ करोडची लॉटरी

ते म्हणतात ना 'देनेवाला जभी देता दते छप्पर फाडके'. हिंदीतली हि उक्ती काही माणसांच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. काही जणांचं नशीब इतकं जबरदस्त असत की त्यांना काही कमी पडतच नाही. 
तुम्ही एकावर एक फ्री ची जाहिरात पाहिलीच असेल. पण समजा तुम्हीला एका लॉटरीवर दुसरी लॉटरी लागली तर तीही तब्बल ७ करोड रुपयांची लॉटरी. तुम्ही डोळे हरखुन त्या पैशांकडे पाहत रहाल. मैसाचुसेट्स येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला तब्बल दोनदा लॉटरी लागली तीही करोडोंच्या घरात. मग काय बोलता मित्रांनो. पैसाच पैसा...
फ्रामिंघमच्या स्टीफन टोटो नामक व्यक्तीला ही लॉटरी लागली आहे. त्याने सांगितले की, फ्रामिंघमच्या ए-१ गल्फ स्टोरमधून दुकानदाराच्या सांगण्यावरून त्याने हे लॉटरीचं तिकीट खरेदी केलं. ते तिकीट होत १ मिलियन डॉलरचं ज्याची किंमत भारतीय चलनात ७ करोडपेक्षाही जास्त आहे आणि त्याच नशीब म्हणजे त्याला ती लॉटरी लागलीही. त्याने तब्बल १ मिलियन डॉलर जिंकले. २०१७मध्येही ते याच तिकिटावर १ मिलियन डॉलरच जिंकले होते. त्यांनी म्हटले, की पैसे जिंकण्याचा आनंद गगनात मावत नव्हता. 
 

Web Title: You may have seen one free ad on another. But suppose you win another lottery on one lottery, that too a lottery of Rs 7 crore